बिहार: ऐन कोरोना काळात आरोग्य केंद्राची केली गोशाळा

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 24 मे 2021

बिहारमधील एका गावात आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांऐवजी चक्क गायी बांधण्यात आल्या आहेत.

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील आरोग्यव्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्था अपुरी असल्याचं चित्र आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन (Oxygen), बेड उपलब्ध न झाल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम आता गावांमध्येही जाणवत आहे. गावांमधील अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून आरोग्यव्यस्थेवर भर देण्यात येत आहे. मात्र देशातील अनेक ठिकाणी उलट चित्र आहे. प्रशासनातर्फे उपलब्ध करुन दिलेल्या आरोग्य व्यवस्थेचा गैरवापर होताना दिसत आहे. बिहारमधील (Bihar) एका गावात आरोग्य केंद्रामध्ये (Primary Health Centre) रुग्णांऐवजी चक्क गायी बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे बिहारच्या आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. (Bihar Kelly Goshala of Health Center during Ain Corona period)

बिहारमधील मधुबनीच्या (Madhubani) खाजौलीतील (Khajauli) सुक्की गावात सरकारी आरोग्य केंद्राचा वापर कोरोना काळातही गोशाळा म्हणून केला जात आहे. ''गेल्या वर्षापर्यंत एकाही आरोग्य अधिकाऱ्याने किंवा डॉक्टरांनी भेट दिली नव्हती. लोक खजौलीमधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जातात,'' असे गावामधील एका नागरिकाने सांगितले.

ब्लॅक फंगस नंतर आता 'व्हाइट फंगस' चे नवे संकट

या आरोग्य केंद्रामध्ये नेमणूक करण्यात आलेले आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खजौलीमधील प्राथमिक रुग्णालयात काम करत आहेत. गावातील हे आरोग्य केंद्र गेल्या 30 वर्षापासून सुरु असल्याचे गावकरी सांगतात.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोग्य केंद्रात गेल्या 20 वर्षापासून गोशाळा चालवण्यात येत आहे. गावामधील नागरिकांना आरोग्याच्या काही समस्या असतील तर खाजगी रुग्णालयात जावे लागते. गावात आरोग्य शिबिराचे आयोजन केले गेले तरी, त्याबद्दल गावातील लोकांना माहिती मिळत नाही. बिहारच्या या चार हजार लोकसंख्या असलेल्या गावामध्ये अनेक लोक किरकोळ आजाराने त्रस्त आहेत. गावातील कोरोनाबाधित रुग्णांनी स्वखर्चाने स्वत:वर उपचार केले आहेत असे गावकऱ्यांनी सांगितले आहे.
 

संबंधित बातम्या