फुलवारी शरीफ प्रकरणात NIA ने UAPA अंतर्गत केला गुन्हा दाखल, पाच PFI संशयितांना अटक

Bihar News: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या अतिरेकी संघटनेचा या प्रकरणाशी संबंध आहे.
NIA
NIA Dainik Gomantak

Phulwari Sharif Case: बिहारमधील फुलवारी शरीफ प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) UAPA कायद्यातर्गंत गुन्हा दाखल केला आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या अतिरेकी संघटनेचा या प्रकरणाशी संबंध आहे. एनआयएने तपास सुरु केला आहे.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाच्या काउंटर टेररिझम आणि काउंटर रॅडिकलायझेशन डिव्हिजनने जारी केलेल्या आदेशानंतर, भारतीय दंड संहिता आणि UAPA कायद्यातर्गंत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएफआय टेरर मॉड्यूल प्रकरणाचा नुकताच बिहार पोलिसांनी खुलासा केला आहे. पीएफआयशी संबंध असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. तसेच भारतविरोधी कारवाई करण्याची त्यांची योजना होती.

NIA
Yasin Malik Hunger Strike: फुटीरतावादी नेता यासिन मलिकचे तिहार तुरुंगात उपोषण; सरकारकडे मोठी मागणी

दुसरीकडे, एनआयएने बुधवारी बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील जामिया मारिया निस्वा मदरशावर छापा टाकला, ज्यामध्ये असगर अली नावाच्या शिक्षकाला अटक केली. त्याचबरोबर झारखंडचे निवृत्त पोलीस अधिकारी मुहम्मद जलालुद्दीन आणि अतहर परवेझ यांना 13 जुलै रोजी पाटण्याच्या फुलवारी शरीफ परिसरातून अटक करण्यात आली होती, तर नुरुद्दीन जंगी याला तीन दिवसांनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी लखनौ येथून अटक केली होती.

फुलवारी शरीफ प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक

फुलवारी शरीफ प्रकरणी बिहार पोलिसांनी (Police) आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. फुलवारी शरीफमध्ये बिहार (Bihar) पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले. या छाप्यामध्ये 'व्हिजन 2047 इंडिया' नावाचा एक दस्तऐवज हाती लागला, ज्यात इस्लामिक देशांनी मदत केलेल्या भारतीय मुस्लिमांनी (Muslim) सशस्त्र हल्ल्यासंबंधी चर्चा केली होती. पोलिसांनी अनेक पीएफआय पॅम्प्लेट्सही जप्त केल्या आहेत.

NIA
Yasin Malik: '...गृहमंत्र्यांच्या मुलीचे अपहरण करण्यापर्यंत', वाचा संपूर्ण प्रकरण

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी दिले प्रशिक्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटणा दौऱ्याच्या 15 दिवसांपूर्वी फुलवारी शरीफमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते. यापूर्वी, तेलंगणाच्या (Telangana) निजामाबादमध्ये अशाच प्रकारची अटक करण्यात आली होती, जिथे पीएफआयने मुस्लिमांना शस्त्र प्रशिक्षण देण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. त्याच वेळी, अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणात पीएफआयच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगची चौकशी सुरु केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com