Nupur Sharma Raw: नुपूर शर्माचा व्हिडिओ पाहिल्यामुळे तरुणावर चाकूने वार

Maharashtra: महाराष्ट्रातील अमरावतीनंतर आता बिहारच्या सीतामढीमध्ये हल्ल्याचं सत्र
Nupur Sharma
Nupur SharmaDainik Gomantak

नुपूर शर्मा प्रकरणा राजस्थानमधील उदयपूर आणि महाराष्ट्रातील अमरावतीनंतर आता बिहारच्या सीतामढीमध्येही असाच हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. नुपूरचा वादग्रस्त व्हिडिओ पाहिल्यानंतर एका तरुणाला चाकूने वार करण्यात आले. मात्र पोलिसांनी या घटनेशी नुपूर शर्माचा संबंध नसल्याचे सांगितले आहे.

या हल्यात अंकित झा (23) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना 15 जुलै रोजी घडली होती असे सांगितले जाते.या प्रकरणी पोलिसानी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे,मुख्य आरोपी अजुन फरार आहे.या हल्यातील पाच आरोपीना अटक करण्‍यात आली आहे.या मध्ये नानपूर गावातील गौरा उर्फ ​​मोहम्मद निहाल आणि मोहम्मद बिलाल यांचा समावेश आहे.

Nupur Sharma
बांगलादेशमध्ये अतिरेक्यांनी केली मंदिरांची तोडफोड, हिंदू समाजाची जाळली घरे

धावत जाऊन त्याच्यावर सहा वार केले

सीतामढी घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण रक्ताने माखलेला दिसत आहे. प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, तरुण एका पान दुकानात उभा होता आणि नुपूर शर्माचा व्हिडिओ पाहत होता. त्यानंतर तेथे सिगारेट ओढत असलेल्या अन्य एका तरुणाशी त्याचे भांडण झाले. त्यानंतर हा तरुण त्याच्या साथीदारांसह आला आणि त्याने अंकितवर हल्ला केला.अंकित बाजारात पळून गेल्यावर सहा वार करण्यात आले. अंकितला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

तक्रारीतून नुपुर शर्माचे नाव वगळले,नातेवाईकांचा आरोप

अंकित झा यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत एफआयआर (FIR) नोंदवण्यात पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कुटुंबीयांचा आरोप आहे की, पहिल्या तक्रारीत त्यांनी हल्ल्याबाबत नुपूर शर्मा प्रकरणाचा उल्लेख केला होता, पण नंतर पोलिसांनी ते बदलण्यास सांगितले. दुसऱ्या तक्रारीवरून नुपूर शर्माचे नाव हटवल्याबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला. नुपुर शर्माचा व्हिडिओ पाहून इतर धर्माच्या तरुणांनी त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप अंकितच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com