कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदींनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद - बिल गेट्स

गोमंतक वृत्तसंस्था
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून भारतातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हाताळण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांचे व प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

नवी दिल्ली :  मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून भारतातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हाताळण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांचे व प्रयत्नांचे कौतुक केले आहे. गेट्स यांनी या पत्रात, “आपण कोरोना साथीसारख्या संकटाच्या काळात केलेले नेतृत्व व विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॅाकडाऊन सारख्या पर्यायांची अंमलबजबणी कौतुकास्पद आहे," असे म्हटले आहे.

कोरोना विषाणू विरूद्धच्या लढ्यात तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्याबद्दल मोदींचे कौतुक करताना ते म्हणाले, "आपल्या सरकारने कोरोना साथी विरूद्ध लढताना डिजिटल क्षमतांचा पूर्णपणे उपयोग केला असून, कोरोना विषाणूचे ट्रॅकिंग, संपर्क, ट्रेसिंग आणि लोकांना आरोग्य सेवांशी जोडण्यासाठी बनवलेले आरोग्य सेतु डिजिटल अ‍ॅप चांगले काम करत आहे." गेट्स यांनी, चाचण्यांची संख्या वाढवल्याबद्दलदेखील सरकारचे कौतुक केले. कोरोनाग्रस्तांचे विलगीकरण केंद्र, लक्षणे नसलेल्या रूग्णांची वेगळी सोय तसेच आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी निधी वाढवणे, यासाठी सरकारने चांगले प्रयत्न केल्याचे गेट्स म्हणाले.

बिल गेट्स हे त्यांची पत्नी मेलिंडासमवेत बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन ही सामाजिक संस्था चालवतात. जागतिक आरोग्य संघटनेत ते दुसर्‍या क्रमांकाचे देणगीदार आहेत. अमेरिका यात अव्वल स्थानी आहे. बिल ऍण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने कोरोना संकटात भारतातील अनेक लोकांना मदत केली आहे.
 

संबंधित बातम्या