West Bengal: बीरभूममध्ये भीषण अपघात, ऑटोरिक्षा अन् बसच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू

Accident in Birbhum: पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग-60 (NH-60) वर मंगळवारी एक भीषण अपघात झाला.
Accident
AccidentDainik Gomantak

Birbhum Accident: पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग-60 (NH-60) वर मंगळवारी एक भीषण अपघात झाला. राज्य परिवहन महामंडळाच्या बसला झालेल्या धडकेत ऑटोरिक्षामधील नऊ जणांचा मृत्यू झाला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ते म्हणाले की, 'ही घटना रामपूरहाटजवळील मल्लारपूर येथे घडली, जेव्हा ऑटोरिक्षा एसबीएसटीसी बसला धडकली. ऑटोरिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते.'

दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रामपुरहाट पोलीस (Police) ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. बीरभूमचे पोलीस अधीक्षक (SP) नागेंद्र नाथ त्रिपाठी यांनी सांगितले की, 'मृत्यू झालेले सर्व जण ऑटोरिक्षात होते. मृतांचे मृतदेह ऑटोतून बाहेर काढण्यात आले. ऑटोचालकाला गंभीर अवस्थेत रामपूरहाट मेडिकल कॉलेजमध्ये (Medical Colleges) दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी रास्ता रोको केला. त्यानंतर संतप्त लोकांना समजावून हटवण्यात आले. यादरम्यान राष्ट्रीय महामार्गावर बराच काळ जाम होता.'

Accident
West Bengal: ...म्हणून झारखंडच्या तीन आमदारांना काँग्रेसने केले निलंबित

भरपाईची घोषणा

बीरभूम जिल्ह्याच्या डीएमने पीडितांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. बंगालचे वाहतूक मंत्री फरहाद हकीम यांनीही पत्रकार परिषदेत सांगितले की, 'सरकारी नियमांनुसार पैसे दिले जातील. विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या सरकारी बसने ऑटोला धडक दिली. या अपघातात ऑटोमधील 9 जणांना आपला जीव गमवावा लागला. कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com