अंबानींच्या नातवाचं झालं बारसं; बाबांच्या नावावरून ठेवं मुलाचं नाव

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

अंबानींच्या मुलाचे नाव 'आकाश' आहे म्हणून त्यांनी ज्युनिअरचे नाव 'पृथ्वी आकाश अंबानी' असे ठेवले.”

नवी दिल्ली: रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि सून श्लोका अंबानी यांना 10 डिसेंबर रोजी मुलगा झाल्यावर मुकेश अंबानी आजोबा झाले. या गोंडस बाळाच्या जन्मानंतर विविध स्तरांतून अंबानी कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला होता.

'भगवान कृष्णाची कृपा आणि धीरुभाई अंबानी यांच्या आशीर्वादानं मुंबईत या लहान मुलाचे आम्ही पालक झालो, अंबानींच्या मुलाचे नाव 'आकाश' आहे म्हणून त्यांनी ज्युनिअरचे नाव 'पृथ्वी आकाश अंबानी' असे ठेवले.” असं कुटुंबियांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. त्यामुळं या नावाची होणारी चर्चा अनेकांचंच लक्ष वेधत आहे. कुटुंबात या नवीन सदस्याचे आगमन झाल्यावर मुकेश अंबानी यांनी आपल्या नवजात नातवाला हाती घेतलेला फोटो त्यावेळी व्हायरल झाला होता.

मागील वर्षीच अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याचा हिरे व्यापारी रसेल मेहता आणि मोना मेहता यांची कन्या श्लोका मेहता हिच्याशी दिमाखात विवाहसोहळा पार पडला. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर इथं त्यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला होता. आणि 10 डिसेंबर 2020 मध्ये आकाश अंबानी आणि सून श्लोका अंबानी यांनी मुलाचे स्वागत केले.

 

संबंधित बातम्या