Bitcoin Scam: मुख्यमंत्र्यांवर कारवाई का नाही? सिद्धरामय्या यांचा PM मोदींना सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) या घोटाळ्याबद्दल काय ‘योग्य’ आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. यासोबतच सिध्दारामय्यांनी दोषींना शिक्षा करण्याची मागणीही केली.
Former Chief Minister Siddaramaiah
Former Chief Minister SiddaramaiahDainik Gomantak

बिटकॉइन घोटाळ्यावरुन (Bitcoin Scam) काँग्रेस (Congress) भाजपवर हल्ला करत आहे. कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Former Chief Minister Siddaramaiah) यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांवर राज्यातील कथित बिटकॉइन घोटाळ्यावरुन निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) या घोटाळ्याबद्दल काय ‘योग्य’ आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. यासोबतच सिध्दारामय्यांनी दोषींना शिक्षा करण्याची मागणीही केली. तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांनीही ट्विटच्या माध्यमातून दोषींना शिक्षा देण्याची मागणी केली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चौकशी करुन आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यास सांगण्याऐवजी पंतप्रधानांनी आरोपांकडे दुर्लक्ष करण्यास सांगणे कितपत योग्य आहे, असा सवालही सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला. पंतप्रधानांना काय हवे आहे, हे एकतर्फी ठरवता येईल का?'

'पीएम मोदी दुर्लक्ष का करत आहेत'?

ते पुढे म्हणाले, “केंद्र आणि राज्याच्या तपास यंत्रणा बिटकॉइन घोटाळ्याची चौकशी करत आहेत. बसवराज बोम्मई सध्या मुख्यमंत्री आहेत. भूतपूर्व मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते गृहमंत्री होते. तपासाच्या या टप्प्यावर मुख्यमंत्र्यांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगून, पंतप्रधान त्यांना चौकशी सोडण्यास सांगत आहेत का?'' यावर माजी मुख्यमंत्र्यांनी विचारले, ''बिटकॉईन घोटाळ्यात बोम्मई यांचा सहभाग आहे का नाही, हे आम्हाला माहीत नाही. आम्ही फक्त त्यांची चौकशी करुन दोषींना शिक्षा करण्याची मागणी करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांकडे दुर्लक्ष का करत आहेत?'

Former Chief Minister Siddaramaiah
पतीवर अप्रमाणित आरोप करणे 'निंदनीय', दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय टांगणीवर!

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Chief Minister Basavaraj Bommai) यांनी गुरुवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर सांगितले की, पंतप्रधानांनी या समस्येची काळजी करु नका, समर्पण आणि प्रामाणिकपणे लोकांसाठी काम करण्याचा सल्ला दिला आहे.

'बिटकॉईनवर पंतप्रधानांशी चर्चा झाली होती का'

पंतप्रधानांसोबतच्या भेटीत बिटकॉइनचा मुद्दा चर्चेसाठी आला का? असे विचारले असता, त्यावर बोम्मई म्हणाले, "यावर (Bitcoin scam) अजिबात चर्चा झालेली नाही. तथापि, जेव्हा मी त्यासंबंधीचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा, त्यांनी (P M Modi) मला या समस्येकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर लोकांसाठी समर्पण आणि प्रामाणिकपणाने काम करा, सर्व काही ठीक होईल असे सांगितले आहे.

Former Chief Minister Siddaramaiah
गुजरात दंगलीत कारसेवकांच्या मृतदेहांची निदर्शने करत केली हिंसेची तयारी : जाफरी

सीएमओने एका निवेदनात म्हटले की, बोम्मई यांच्या नेतृत्वासाठी पंतप्रधान मोदींचा पाठिंबा आहे. काही काळापासून या घोटाळ्यात राजकीय प्रभावशाली लोकांचा सहभाग असल्याची अटकळ बांधली जात होती, जेव्हा सीसीबीच्या अधिकार्‍यांनी शहरातील हॅकर श्रीकृष्ण उर्फ श्रीकी याच्याकडून 9 कोटी रुपयांचे बिटकॉइन जप्त केले होते, ज्यावर सरकारी पोर्टल हॅक केल्याचा आरोपही करण्यात आला होता. डार्कनेटद्वारे अंमली पदार्थांची मागणी करणे आणि क्रिप्टोकरन्सीद्वारे त्यासाठी पैसे देण्यात येत असल्याचे देखील समोर आले आहे. या घोटाळ्यात भाजपचे वरिष्ठ नेते, त्यांचे कुटुंबीय आणि वरिष्ठ अधिकारी यांचा सहभाग असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला.

शिवाय, राज्याचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, “केंद्रात आणि राज्यात त्यांची सरकारे आहेत. त्यांनी निष्पक्ष चौकशी करुन घोटाळ्यात सहभागी असलेल्यांची नावे उघड करावीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com