जर्मनीत झालेल्या शेतकरी आंदोलनात फडकविले पाकिस्तानी झेंडे; बीजेपीने केला कॉग्रेसवर आरोप

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेश नाखुआ यांनी असा आरोप केला आहे की,जर्मनीत शेती कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनात पाकिस्तानचा झेंडा फडकावला गेला आहे. 

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेश नाखुआ यांनी असा आरोप केला आहे की,जर्मनीत शेती कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनात पाकिस्तानचा झेंडा फडकावला गेला आहे. एक फोटो शेअर करत त्यांनी हा दावा केला की, हे प्रदर्शन इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेस (आयओसी) च्या अधिकाऱ्यांनी आयोजित केले होते. मात्र आयओसीनेही सोमवारी निवेदन पाठवून या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे.

“राहुल गांधींची कॉंग्रेस पाकिस्तानच्या ताब्यात आहे. इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेसच्या अधिकाऱ्यांनी जर्मनीतील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ निदर्शनादरम्यान पाकिस्तानचा झेंडा फडकविला. चरण कुमार निळ्या रंगाच्या (कपड्यांमध्ये) पाकिस्तानचा झेंडा पकडून आहे. लाल रंगाच्या (कपड्यांमध्ये) राज शर्मा हा आयओसी जर्मनीचा कार्यकर्ता आहे,” असे ट्विट करत मुंबई भाजपचे प्रवक्ते सुरेश नाखुआ यांनी कॉंग्रेसवर आरोप केला आहे.

सोशल मिडिया वापरण्याचे हे नवे नियम माहिती आहेत का? 15 एप्रिलपासून होणार लागू 

त्यांनी ट्विटमध्ये काही लोकांचे फोटोही शेअर केले आहेत. मात्र, इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेस, जर्मनीने एक प्रसिध्दीपत्रक जारी करून भाजपा नेत्याचा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. "प्रचाराच्या माध्यमातून भाजपला कॉंग्रेसची बदनामी करायची आहे. राज शर्मा आयओसी-जर्मनी मध्ये एक कार्यकर्ता आहे.  राज शर्मा यांचे वय 65 वर्षा आहे आणि ते प्रतिष्ठीत भारतीय आहे. तर सुरेश नाखुआचा यांनी शेअर केलेला फोटो एका युवकाचा आहे," असे आयओसी जर्मनीचे अध्यक्ष प्रमोद कुमार यांच्या नावाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

केंद्र सरकारचे न्यायव्यवस्थेवर नियंत्रण; राहुल गांधीचा मोदी सरकारवर हल्लाबोल 

“आयओसी जर्मनीने कोणताही कार्यक्रम आयोजित केलेला नाही आणि आमचा एकही सदस्य सुरेश नाखुआने शेअर केलेल्या फोटोत दिसत नाही. आयओसी-जर्मनीचे सदस्य खरे देशभक्त आहेत आणि आपल्या महान देशाच्या मूल्यांचा गौरव आणि सन्मान करणारे आहेत. आमचा या व्यक्तीशी आणि पाकिस्तानी ध्वज फडकविण्याच्या कार्यक्रमाशी काही संबंध नाही. कॉंग्रेस पक्ष आणि शेतकर्‍यांच्या कामगिरीची बदनामी करण्यासाठी भाजपा आणि आयटी सेलच्या या प्रचाराचा आम्ही तीव्र निषेध करतो. आम्ही पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाचे जोरदार समर्थन करतो आणि भाजप सरकारच्या बेकायदेशीर शेतकरीविरोधी कायद्यांचा विरोध करतो," असे आयओसी-जर्मनीने म्हटले आहे.

 

संबंधित बातम्या