Bihar elections: सुशांतसिंह राजपूतचा भाऊ हरतोय की जिंकतोय? वाचा...

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

नीरज यांनी २०१५मध्ये या विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला होता. यानंतर त्यांचा मतदारसंघ बराच चर्चेत आला होता.        

पाटणा- आज बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. राज्यातील छातापूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून सुशांतसिंह राजपूत यांचे चुलत बंधू नीरज बबलू हे उभे असून राजदच्या  विपीन सिंह यांचे त्यांना आव्हान आहे. नीरज यांनी २०१५मध्ये या विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला होता. यानंतर त्यांचा मतदारसंघ बराच चर्चेत आला होता.        

दरम्यान, छातापूरमधील मुख्य उमेदवार असलेले नीरज बबलू ५२० मतांनी आघाडीवर असून त्यांनी राजदचे उमेदवार विपिन सिंह यांना मागे टाकले आहे. मात्र, अद्याप निर्णायक आघाडीपासून ते बरेच दूर असून निकाल बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
मागील विधानसभा निवडणुकीचा (2015) निकाल- 

२०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नीरज बबलू यांनी भाजपच्या तिकिटावर लढताना राजदच्या जहूर आलम यांचा ९ हजार मतांनी पराभव केला होता. त्याआधी २०१० मध्ये जदयूच्या तिकिटावर लढताना त्यांनी अकील अहमद यांचा २३ हजार मतांनी पराभव केला होता. 

संबंधित बातम्या