"मी बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं सरकार उलथवायलाच आलोय": गृहमंत्री अमित शहा

"मी बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं सरकार उलथवायलाच आलोय": गृहमंत्री अमित शहा
BJP claims to win more than 200 seats in West Bengal State assembly elections

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने बंगालमध्ये आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा भाजपाला बळ देण्यासाठी सतत बंगाल दौर्‍यावर आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आणि ते म्हणाले, "मी बंगालमध्ये ममता यांचे सरकार उलथून टाकण्यासाठीच आलो आहे".

एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, पश्चिम बंगालमधील टीएमसी सरकारला भाजपच राज्यातून उलथवू शकते. त्यांनी ममता सरकारवर जोरदार टीका केली आणि म्हणाले, "बंगालचं राज्य सरकार कोसळलं आहे. लोकांना लवकरात लवकर हे सरकार उखडून टाकायचे आहे. आमच्या मनात ममता दिदींबद्दल कोणत्याही प्रकारची कटुता नाही परंतु त्यांच्या होणारे राज्यात भ्रष्टाचाराचे प्रकार पाहून चिडचिड होते. यामुळेच यावेळी आम्ही टीएमसीला सत्तेतून पायउतार करण्याचा संकल्प केला आहे."

बंगालची सद्यस्थिती पूर्णपणे बदलणार असून, परिवर्तन यात्रेचा उद्देश केवळ मुख्यमंत्री किंवा राज्यातील सत्ता बदलणे नव्हे, तर बंगालमध्ये बदल घडवून आणण्याची उद्देश असल्याचं गृहमंत्री अमित शहा म्हणाले. कोणत्याही राज्यात जेव्हा जनतेच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण केल्या जात नाही, तेव्हा बदल होतो असंदेखील अमित शहा म्हणाले. 

पश्चिम बंगालमध्ये २०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा 

"बंगालच्या दौर्‍यादरम्यान लोकांचा कल ज्याप्रकारे भाजपकडे दिसून येतोय, त्यावरून आमचा विश्वास आहे की यावेळच्या निवडणुकीत भाजप 200 पेक्षा जास्त जागा जिंकून पूर्ण बहुमतात सरकार बनवेल. मी हे कशाच्या आधारावर करतो यावर बरेच लोक विचार करतात, मग मी त्या सर्व लोकांना खात्री देतो की भाजपचा पूर्ण विश्वास आहे की बंगालमध्ये पूर्ण बहुमताने भाजपचे सरकार स्थापन होणार आहे, कारण बंगालची जनता भाजपबरोबर आहे", असं अमित शहा म्हणाले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com