पंतप्रधान मोदींच्या बैठकीत केजरीवाल काढत होते डुलक्या

दिल्ली भाजपने ट्विटरवर शेअर केलेल्या क्षणाच्या 19-सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्र प्रदेशचे जगन मोहन रेड्डी आणि कर्नाटकचे बसवराज बोम्मई हे देखील दिसले.
पंतप्रधान मोदींच्या बैठकीत केजरीवाल काढत होते डुलक्या
BJP criticizes Delhi CM Arvind Kejriwal Dainik Gomantak

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोविड-19 आढावा बैठकीदरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची बुधवारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) निंदा केली. मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत असताना केजरीवाल आपले दोन्ही हात डोक्यावर आणि खुर्चीच्या मागच्या बाजूला ठेवत होते, तेसेच ते जांभई देखील देत होते. ट्विटरवर, भाजप दिल्लीने त्या क्षणाची व्हिडिओ क्लिप शेअर केली आणि लिहिले, “दिल्लीचे स्वैर मुख्यमंत्री!”

(BJP criticizes Delhi CM Arvind Kejriwal)

BJP criticizes Delhi CM Arvind Kejriwal
न्यायालयात स्थानिक भाषा वापरा; PM मोदींचे सर्व न्यायाधीशांना आवाहन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल किंवा आप या दोघांकडूनही भाजपच्या हल्ल्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

भाजपने शेअर केलेल्या 19 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, कर्नाटकचे बसवराज बोम्मई, छत्तीसगडचे भूपेश बघेल आणि आंध्र प्रदेशचे जगन मोहन रेड्डी हे देखील दिसले.

आढावा बैठकीत मोदींनी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले कारण कोविड-19 साथीच्या आजाराशी संबंधित आव्हाने अद्याप संपलेली नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व पात्र मुलांमध्ये लवकरात लवकर लसीकरणास प्राधान्य देण्यास सांगितले ज्यासाठी त्यांनी शाळांमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले.

मोदींनी केंद्र-राज्य सहकार्याच्या गरजेवरही भर दिला तसेच पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे भारताला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असताना सध्याच्या युद्ध परिस्थितीत याची अधिक गरज असल्याचे सांगितले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा संदर्भ देत पंतप्रधानांनी सर्व राज्यांना इंधनाच्या किमतींवरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले.

त्यांनी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, झारखंड, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणाची नावे दिली. या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मोदी म्हणाले, “मी तुम्हाला फक्त आवाहन करत आहे की जे काही सहा महिन्यांपूर्वी व्हायला हवे होते त्याची अंमलबजावणी करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com