Video: फाळणीचा व्हिडीओ शेअर करत भाजपने डागली नेहरुंवर तोफ

Independence Day: भारताच्या 'विभाजन विभिषिका मेमोरियल डे' निमित्त, भाजपने काँग्रेसवर निशाणा साधत एक व्हिडिओ जारी केला आहे.
Jawaharlal Nehru
Jawaharlal NehruDainik Gomantak

Independence Day: भारताच्या 'विभाजन विभिषिका मेमोरियल डे' निमित्त, भाजपने काँग्रेसवर निशाणा साधत एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये भाजपने 1947 च्या घटनांवर प्रकाश टाकला आहे. सात मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये भारताच्या फाळणीसाठी जवाहरलाल नेहरुंना जबाबदार धरण्यात आले आहे. मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीगच्या पाकिस्तान निर्मितीच्या मागणीला बळी पडल्याचा ठपका नेहरुंवर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, या व्हिडिओवरुन काँग्रेसने (Congress) प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, '14 ऑगस्ट हा 'फाळणी विभिषिका स्मृती दिन' म्हणून साजरा करण्यामागील पंतप्रधानांचा खरा हेतू आपल्या राजकीय फायद्यासाठी अत्यंत वेदनादायक ऐतिहासिक घटनांचा वापर करणे हा आहे.'

Jawaharlal Nehru
IMF Loan: भारताचे शेजारी कर्जबाजारी ; पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश अव्वल

त्याचवेळी ते म्हणाले, 'आधुनिक काळातील सावरकर आणि जीना देशाचे विभाजन करण्याचे प्रयत्न आजही करत आहेत.'

दुसरीकडे, गेल्या वर्षी 14 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी घोषणा केली होती की, 1947 च्या फाळणीदरम्यान भारतीयांनी भोगलेल्या दु:खाची आणि बलिदानाची देशाला आठवण करुन देण्यासाठी दरवर्षी 14 ऑगस्ट हा दिवस 'विभाजन विभिषिका स्मृती दिन' म्हणून साजरा केला जाईल. रविवारी सकाळी पंतप्रधान मोदींनीही याबाबत ट्विट केले आहे.

तसेच, भाजपचा (BJP) व्हिडिओ सिरिल जॉन रॅडक्लिफ दाखवतो, ज्यांच्या विभाजनाचा नकाशा जवळपास पंजाब आणि बंगालला अर्ध्या भागात विभाजित करतो. यासोबतच भारतीय सांस्कृतिक वारशाची माहिती नसलेल्या व्यक्तीला अवघ्या काही आठवड्यात भारताचे विभाजन कसे होऊ दिले, असा प्रश्नही विचारण्यात आला. फाळणीची भीषणता सांगणाऱ्या व्हॉइस-ओव्हरसह नेहरुंचे व्हिज्युअल संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवले आहेत.

Jawaharlal Nehru
पाकिस्तान लष्करप्रमुखांनी कर्जासाठी मागितली अमेरिकेची मदत

भाजपने हा व्हिडीओ ट्विट करत लिहिले की, 'ज्यांना भारताचा सांस्कृतिक वारसा, सभ्यता, मूल्ये, तीर्थक्षेत्रांची माहिती नव्हती, त्यांनी अवघ्या तीन आठवड्यात शतकानुशतके एकत्र राहणाऱ्या लोकांमधील सीमारेषा आखून दिली. या फुटीरतावादी शक्तींविरुद्ध लढण्याची जबाबदारी त्या वेळी कुठे होती?'

शिवाय, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी या व्हिडीओवर जोरदार प्रहार करत एकामागून एक ट्विट करत म्हटले की, 'सत्य हे आहे की, द्विराष्ट्राचा सिध्दांत सावरकरांनी दिला होता.'

Jawaharlal Nehru
भारत-पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कप मॅचवर 'रावळपिंडी एक्सप्रेस' ने केली भविष्यवाणी

जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले की, 'सत्य हे आहे की, द्विराष्ट्राचा सिध्दांत हा सावरकरांनी दिला आणि तो जीनांनी ते पुढे नेला. पटेल यांनी पुढे असेही म्हटले की, 'मला वाटते की, फाळणी मान्य केली नसती तर तर भारताचे अनेक तुकडे झाले असते.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com