जिवंत पत्रकाराला भाजपने आपला कार्यकर्ता म्हणत मृत घोषित केले

दैनिक गोमंतक
गुरुवार, 6 मे 2021

व्हिडीओमध्ये भारतीय जनता पक्षाने अभरो बॅनर्जी नामक एका पत्रकाराला आपला कार्यकर्ता म्हणत थेट मृत घोषित केले आहे.

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) विधानसभा निवडणुकांचे (Election) निकाल जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसा (Violence) सुरू पाहायला मिळते आहे. हिंसेच्या या घटनांमध्ये आपले कार्यकर्ते मारले गेले असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतोय. मात्र असाच दावा करणाऱ्या एका व्हिडीओमध्ये भाजपने (BJP) एका पत्रकाराला आपला कार्यकर्ता म्हटल्याने भारतीय जनता पक्ष आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.(BJP declared the living journalist dead as its worker)

पश्चिम बांगलमध्ये होणाऱ्या हिंसाचारात भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असल्याचे म्हणत भारतीय जनता पक्षाकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मात्र हा व्हिडीओ समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून एक मोठी चूक झाल्याचे दिसून येते आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय जनता पक्षाने अभरो बॅनर्जी नामक एका पत्रकाराला आपला कार्यकर्ता म्हणत थेट मृत घोषित केले आहे.

होमिओपॅथीक औषध घेतल्यामुळे एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू

या प्रकरणानंतर पत्रकार अभरो बॅनर्जी यांनी स्वतः या गोष्टीचा खुलासा करणारे ट्विट करता संबंधित व्हिडीओ समोर ठेवला आहे. "माझे नाव अभरो बॅनर्जी असून मी सीतालकुची पासून 1300 किमी दुर राहतो.भारतीय जनता पक्षाच्या आयटीसेलकडून माझे  नाव माणिक मोईत्रा असे सांगितले जात असून आपण सीतालकुचीचे रहिवासी असल्याचे सांगितले जाते आहे. अशा माहितीवरून विश्वास ठेवू नका, काळजी करू नका मी जिवंत आहे" असे स्पष्ट केले आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या नंतर उसळलेल्या हिंसाचारासाठी भारतीय जनता पक्षाने तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले आहे. आपल्या पक्षाचे 14 कार्यकर्त्यांचा या हिंसाचारात मृत्यू झाला असल्याचे भारतीय जनता पक्षाकडून सांगण्यात येते आहे. 

दरम्यान, केंद्रीय गृह विभागाची एक समितीदेखील या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी आज पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली आहे. ही समिती राज्यात असतानाच केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरण यांच्या ताफ्यावर जमावाने लाठ्या काठ्या घेऊन हल्ला केल्याची घटना घडली आहे.

संबंधित बातम्या