
Smriti Irani On Adhir Ranjan Chowdhury Remark: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी लोकसभेत काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonoa Gandhi) यांच्यावर हल्लाबोल केला. सोनिया जी तुम्ही तुमच्या पक्षातील लोकांना द्रौपदी मुर्मूचा अपमान करण्याची सुट दिली आहे का? देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर असलेल्या महिलेचा अपमान सोनिया गांधींनी तुम्ही मान्य केला असा आरोप इराणी यांनी लोकसभेत केला आहे. नंतर लोकसभेचे कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
यापूर्वी स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, 'काँग्रेस आणि त्यांचे नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल राष्ट्रपती आणि देशाची माफी मागावी. काँग्रेसने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवार म्हणून कठपुतली म्हटले.' या संपुर्ण प्रकरणानंतर भाजपने कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. आणि देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माफी मागावी अशी मागणी केली.
काँग्रेसने राष्ट्रपती आणि देशाची माफी मागावी
'सोनियाजींच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसने हे संस्कार मोठे केले आहेत का? त्यांच्या या कृत्यामुळे संविधानाच्या नियमांचा भंग झाला आहे. अधीर रंजन चौधरी यांना माहीत आहे की, हे संबोधन भारताच्या प्रत्येक मूल्याच्या, प्रत्येक संस्काराच्या विरोधात आहे, तरीही त्यांनी द्रौपदी मुर्मूजींना 'राष्ट्रपत्नी' म्हणून संबोधले. संसदेत आणि रस्त्यावर काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनी देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि देशाची माफी मागितली पाहिजे', असे इराणी लोकसभेत म्हणाल्या.
भाजपचा कॉंग्रेस नेत्यावर आरोप
सभागृह नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देशाची पत्नी म्हणून संबोधल्याचा आरोप भाजपने केला आहे. याशिवाय निवडणुकीपूर्वी काँग्रेसने एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना कठपुतली म्हणून संबोधले होते. या प्रकरणावर आज स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसला फटकारले आणि या सर्व वक्तव्यांवर काँग्रेसला राष्ट्रपती आणि देशाची माफी मागावी लागेल, असे सांगितले.
अधीर रंजन चौधरी यांचे स्पष्टिकरण
काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या 'राष्ट्रपत्नी' या विधानावर भाजपने ठाम भूमिका दाखवली, तर दुसरीकडे स्पष्टीकरण देताना 'माझ्या तोंडातून चूकून निघून गेले, चूक झाली, आता फाशी द्यायची असेल तर द्या. मी यापूर्वी अनेक विधाने केली आहेत ज्यात मी राष्ट्रपती असे बोललो आहे. सध्या एका पत्रकाराशी बोलत असताना माझ्या तोंडून चूकून 'राष्ट्रपत्नी' बाहेर पडले. मी मुद्दाम काही बोललो नाही. भारताचा राष्ट्रपती, ब्राह्मण असो, मुस्लिम असो किंवा आदिवासी, असो त्या आमच्यासाठी राष्ट्रपतीच आहेत.' असे स्पष्टिकरण अधीर रंजन चौधरी यांनी भाजपच्या निषेधानंतर दिले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.