पाच राज्यांमधील निवडणूकांसाठी दिल्लीत भाजपची खलबतं; बैठकीला पंतप्रधानांची उपस्थिती

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रिय पदाधिकाऱ्यांची दिल्लीत आज बैठक पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. 

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रिय पदाधिकाऱ्यांची दिल्लीत आज बैठक पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.  या बैठकीत येत्या काही महिन्यांत होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबरोबरच अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा करतील. भाजपचे राष्ट्रिय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीतील एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5 या दरम्यान ही बैठक होणार आहे.

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक

एनडीएमसी अधिवेशन केंद्रात सुरू झालेल्या भाजपच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी स्वागत केले. या बैठकीत गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर चर्चा होऊन, सरकार या विषयावर रणनीती तयार करण्याची शक्यता आहे. बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या सर्व राज्यांचे अध्यक्ष, प्रभारी व राज्यांचे सहकारी, सर्व राज्यांचे संघटनेचे सरचिटणीस उपस्थित असतात. गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाचे सर्व मोठे नेते आणि संसदीय मंडळाचे सदस्यही या बैठकीत भाग घेतील.

टूलकिट प्रकरण: ग्रेटाने भारताला दिले मानवाधिकारांचे धडे; दिशा रवीचे समर्थन

या अजेंड्यावर बैठकीत चर्चा होईल

या सभेसाठी अद्याप पक्षाकडून कुठल्याच अजेंडाबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही, या बैठकीत पक्षाच्या संघटनेवर, भाजपशासित राज्यांमध्ये पक्ष आणि सरकार यांच्यात समन्वय साधून चर्चा केली जाईल. यासह, ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही, अशा राज्यांमध्ये सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्र सरकारच्या गरीब कल्याणकारी योजनांच्या फायद्यावर चर्चा होईल. यासह दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यामविरूद्ध सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही चर्चा होईल. कृषी कायदा रद्द होणार नाही, असे सरकारने आधीच स्पष्ट केले आहे. अशा प्रकारे या कायद्याच्या नावाखाली राजकीय पक्ष भाजपची बदनामी कशी करीत आहेत आणि सरकार या मुद्दय़ावर कसे पुढे जाऊ शकते यावर चर्चा केली जाईल.

संबंधित बातम्या