'तेजस्वी यादव यांना कॅबिनेटचे स्पेलिंगही येत नाही'

'तेजस्वी यादव यांना कॅबिनेटचे स्पेलिंगही येत नाही'
tejaswi yadav

पाटणा- तेजस्वी यादव यांना कॅबिनेटचे अचूक स्पेलिंगही सांगता येणार नाही, अशी टीका भाजप नेते व केंद्रीय मंत्री अश्विनी यांनी केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आरोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तसेच आरजेडीचे प्रमुख नेते तेजस्वी यादव यांच्यावर सातत्याने भाजपकडून टीका केली जात आहे. 

 'जो उमेदवार दहावी परीक्षाही उत्तीर्ण होऊ शकला नाही, तो इंजिनिअर नितीश कुमार यांच्यावर टीका करत आहे. त्यांना बिहारच्या मुद्यांबाबत कल्पना असण्याची शक्यताही नाही. तेजस्वी कॅबिनेटचे स्पेलिंगही लिहू शकत नाही. त्यांच्या वडिलांनीही अशाच पद्धतीने पहिल्या कॅबिनेटमध्ये एक लाख नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्यांनी जनतेकडून पैसे घेतले आणि नोकरीचे अर्ज अजूनही कचरा कुंडीत पडले आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी बोलताना केली. 

जनतेला सावध राहण्याचा सल्ला देताना चौबे म्हणाले की, काँग्रेस-आरजेडी महाआघाडीचे लोक गप्पू आणि पप्पू आहेत. ते केवल लप्पू म्हणजे खोटी आश्वासने देतील. नागरिकांनी अशा आश्वासनांपासून सावध राहिले पाहिजे. यावेळी त्यांनी बिहारमधील नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याच्या आश्वासनाचाही उल्लेख केला. 
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com