स्वाईन फ्लूने घेतला भाजप नेत्याचा बळी, या वर्षातील पहिला मृत्यू

पंजाबमध्ये यावर्षी स्वाइन फ्लूमुळे पहिला मृत्यू झाला आहे.
BJP Leader
BJP LeaderDainik Gomantak

पंजाबमध्ये यावर्षी स्वाइन फ्लूमुळे पहिला मृत्यू झाला आहे. लुधियानामध्ये 46 वर्षीय वकील आणि भाजप नेत्याला H1N1 विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृत संदीप कपूर हे किचलू नगर येथे राहत होते. ते भाजपच्या विधी आणि विधिमंडळ सेलचे सहसंयोजक होते. 17 जून रोजी त्यांना H1N1 ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर दयानंद वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरु होते. (bjp leader death swine flu h1n1 virus Punjab Ludhiana)

दरम्यान, राज्याचे एपिडेमियोलॉजिस्ट तज्ज्ञ डॉ.गगनदीप सिंग ग्रोव्हर म्हणाले की, ''पंजाबमध्ये (Punjab) स्वाइन फ्लूमुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. सध्या स्वाइन फ्लूचे आणखी दोन रुग्णही रुग्णालयात (Hospital) उपचार घेत आहेत. रुग्णांमध्ये एक व्यक्ती 52 वर्षांची तर दुसरी 57 वर्षांची आहे.'' त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

BJP Leader
Karnatakaमध्ये आढळलेल्या 'टोमॅटो फ्लू'ची लक्षणे घ्या जाणून

दुसरीकडे, दाखल झालेल्या तीन रुग्णांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आली होती. लुधियानाचे सिव्हिल सर्जन डॉ. एसपी सिंह म्हणाले की, 'संदीप कपूर यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना रोगप्रतिबंधक उपचार देण्यात आले होते. कपूर हे संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आले असावेत, असा संशय आरोग्य विभागाला आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com