काश्मिरात दहशतवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या

जावेद मात्जी
शुक्रवार, 10 जुलै 2020

वडील आणि भावासह तिघांचा मृत्यू ; लष्करे तोयबाचा हात असल्याचा पोलिसांचा दावा

श्रीनगर

जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी भाजप नेते शेख वसीम, त्यांचे वडील आणि त्यांच्या भावाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली. या हल्ल्यामागे लष्करे तोयबाचा हात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुरवारी रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात वसीम शेख, त्यांचे वडील बशीर अहमद आणि त्यांचा भाऊ उमर बशीर जखमी झाले होते त्यांना रुग्णालयात दाखल केले असता तिघांचाही मृत्यू झाल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली.
शेख वसीम हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष होते आणि आपल्या कुटुंबीयांसोबत एका दुकानाजवळ बसले होते. त्याचवेळी अचानक आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. वसीम यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. परंतु घटनेदरम्यान त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नव्हते. वसीम यांच्यावर झालेला हल्ला हा नियोजन बद्ध होता अशी माहिती काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक (आयजीपी) विजय कुमार यांनी दिली असून जम्मू काश्मीर पोलिसांनी खासगी सुरक्षा अधिकाऱ्यांना आपले कर्तव्य योग्यरीत्या न बजावल्याच्या आरोपाखाली अटक केले आहे.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या