राष्ट्रध्वज अवमान केल्याचा भाजप नेत्याला पश्‍चात्ताप

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

राष्ट्रध्वजाच्या अवमान केल्याच्या घटनेत पोलिसांनी भाजपचे नेते व विनोदी कलाकार एस. व्ही. शेखर यांनी या विधानाबद्दल पश्‍चात्ताप झाल्याची कबुली मद्रास उच्च न्यायालयात गुरुवारी दिली.

चेन्नई: राष्ट्रध्वजाच्या अवमान केल्याच्या घटनेत पोलिसांनी भाजपचे नेते व विनोदी कलाकार एस. व्ही. शेखर यांनी या विधानाबद्दल पश्‍चात्ताप झाल्याची कबुली मद्रास उच्च न्यायालयात गुरुवारी दिली.  या द्वारे त्यांनी अटकेपासून सुटका करून घेतली.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी एमजीआर यांच्या पुतळ्याला भगव्या रंगातील शाल पांघरली होती. त्यावर विनोदी कलाकार शेखर यांनी भगवा रंग हा हिंदूचे प्रतिनिधित्व करतो, असे सांगत मुख्यमंत्र्यांच्या या कृतीवर आक्षेप नोंदविला होता. त्यावरून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. यावर अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी गेल्या आठवड्यात याचिका दाखल केली होती. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या