सुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर; मोदींना श्रीनगरला जाण्याचा दिला सल्ला

गुरुवारी रात्री 36 वर्षीय काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर रात्री उशिरापर्यंत निदर्शने सुरू होती.
सुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर; मोदींना श्रीनगरला जाण्याचा दिला सल्ला
Subramanian SwamyDainik Gomantak

काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येवरून राजकारण चांगलेच तापले आहे. ही हत्या दहशतवाद्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे. यावरून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी शुक्रवारी भाजपला घरचा आहेर दिला. ते म्हणाले, भट्ट यांची हत्या मोदी सरकार हलक्यात घेत आहे. मोदी फक्त जम्मूला का जात आहेत? त्यांनी तातडीने श्रीनगरला जावे, असे देखील सुब्रमण्यम स्वामी म्हणाले. (BJP leader Subramanian Swamy advices PM Modi to go to Srinagar)

Subramanian Swamy
NEET PG Exam सात दिवसांनंतर होणारच

काश्मिरी पंडित यांच्या हत्येनंतर निदर्शने

गुरुवारी रात्री 36 वर्षीय काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर रात्री उशिरापर्यंत निदर्शने सुरू होती. छावणीत राहणाऱ्या काश्मिरी पंडितांनी या हत्येविरोधात रास्ता रोको करून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यासोबतच केंद्र सरकारवर अपयशाचा आरोप करण्यात आला. अनेक ठिकाणी मेणबत्त्या पेटवून निदर्शने करण्यात आली.

Subramanian Swamy
गाण्यांमध्ये 'गन कल्चर'ला चालना दिल्यास होणार कारवाई, मुख्यमंत्री मान यांचा पंजाबी गायकांना इशारा

दहशतवादी 'टार्गेट किलिंग' करत आहेत

दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग करत आहेत. रियाझ अहमदवर झालेला हल्लाही त्याचाच एक भाग असल्याचे दिसते. यापूर्वी खोऱ्यात दहशतवाद्यांनी ज्याप्रकारे हत्या केल्या होत्या, त्यावरून यावेळी दहशतवादी लक्ष्य करून हत्या करत असल्याचे दिसून येत आहे. काल काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची हत्या झाली, त्यानंतर आज पोलिस हवालदार रियाझ अहमद यांना लक्ष्य करण्यात आले. याआधी शनिवारी अली जान रोडवर असलेल्या आयवा ब्रिजवर दहशतवाद्यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.