सत्तारूढ भाजपकडून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या दौऱ्याची खिल्ली

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

‘‘राहुल गांधी यांची भारतातील सुटी संपली असून ते आता इटलीला परत गेले आहेत.’’

नवी दिल्ली: ‘‘राहुल गांधी यांची भारतातील सुटी संपली असून ते आता इटलीला परत गेले आहेत.’’ अशा  उपरोधिक शब्दांत सत्तारूढ भाजपकडून काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या ताज्या विदेश दौऱ्याची खिल्ली उडविण्यात आली. 
दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन तीव्र झालेले असताना व खुद्द काँग्रेस पक्ष आपला १३६ वा वर्धापनदिन साजरा करत असताना त्याच दिवशी राहुल गांधी यांनी पुन्हा विदेश प्रयाण केल्याने भाजपला त्यांच्यावर पुन्हा टीका करण्याची संधी मिळाली आहे. ज्या कृषी कायद्यांवरून सध्या आंदोलन सुरू आहे ते यंदा सप्टेंबरमध्ये मोदी सरकारने संसदेत मंजूर करवून घेतले. तेव्हाही गांधी हे परदेशातच होते, याकडेही भाजपने लक्ष वेधले.

संबंधित बातम्या