भाजपला लोकसभेच्या 40 जागांवर फटका बसण्याची शक्यता

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मंगळवारी पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश या राज्यामधील भाजप नेत्यांची चर्चा करुन त्यांच्याकडून राज्यांतील परिस्थिती समजून घेतली आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने बनवलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन करत आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी संघंटना यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या मात्र अद्याप कोणत्याही प्रकारचा तोडगा निघू शकलेला नाही. केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत अशी मागणी शेतकरी संघंटनांनकडून करण्यात येत आहे. हे आंदोलन पंजाब, हरियाण, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये तीव्रतेने पसरु लागल्यामुळे भाजप नेत्यांच्या चिंतेत वाढ होत आहे. सरकारवरील शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मंगळवारी पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश या राज्यामधील भाजप नेत्यांची चर्चा करुन त्यांच्याकडून राज्यांतील परिस्थिती समजून घेतली आहे.

सनी देओलच्या बालेकिल्ल्यात भाजप पराभूत

शेतकरी आंदोलनाचे लोन जाट पट्ट्यात पसरु लागल्यामुळे भाजप नेत्यांच्या चिंतेत अधिक वाढ होत आहे. पश्चिम उत्तरप्रदेशातील साखर पट्ट्यात आंदोलक शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ महापंचायती घडत असतानाच भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी,नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आमदार, खासदार, आणि जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री आणि कृषी राज्यमंत्री संजीव बालियान हे प्रमुखत:हा जाट समाजातून येतात. यामुळे त्यांच्यावर जाट समाजातून रोष वाढत आहे.

कृषी कायद्याचे शेतकऱ्यांसाठी फायदे सांगण्याची मोहीम तीव्र करा. जेणेकरुन शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्यांना प्रत्यक्षातच लोकांकडूच उत्तरे मिळतील अशा सूचना गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून भाजप सदस्यांना देण्यात आल्या आहेत.असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.     

संबंधित बातम्या