कोरोनापासून मुक्ती मिळवण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांचा विमानतळावर पूजेचा घाट 

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 10 एप्रिल 2021

मध्यप्रदेशच्या मंत्री उषा ठाकूर यांनी इंदोरच्या विमानतळावर अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर या पूजेचा घाट घातला.

इंदोर: देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असताना पुन्हा एकदा कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे सरकारसोबत नागरिकांच्या चिंतेतही वाढ झाली आहे. या पाश्वभूमीवर प्रत्येक नागरिक वाढत्या कोरोनाच्या संकटातून लवकरात लवकर मुक्ती मिळावी, अशीच इच्छा व्यक्त करताना दिसत आहे. त्यातच आता मध्यप्रदेशचे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी कोरोनापासून मुक्ती मिळवण्यासाठी चक्क विमानतळावरच पूजेचा घाट घातला आहे. तसेच या पूजेच्या व्हिडिओमध्ये मंत्री उषा ठाकूर यांनी चेहऱ्यावर मास्क देखील घातलेला नसल्यामुळे त्यांची पूजा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनत आहे.

मध्यप्रदेशच्या मंत्री उषा ठाकूर यांनी इंदोरच्या विमानतळावर अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर या पूजेचा घाट घातला. यावेळी उषा ठाकूर यांच्यासोबत विमानतळ संचालक आर्यमा सन्यास आणि इतर विमानतळावरील कर्मचारी देखील उपस्थित होते. याआगोदर देखील मंत्री महोदया उषा ठाकूर या विना मास्क अनेक ठिकाणी दिसल्या आहेत. माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला असता, ‘’मी रोज हवन करते आणि हनुमान चालीसा देखील म्हणते त्यामुळे मला मास्क घालण्याची काही आवश्यकता नाही,’’  असं उत्तर त्यांनी दिलं. याआधीही ठाकूर बाईंनी गायीच्या सुकलेल्या शेणाचं हवन केल्यास घर 12 तास सॅनेटाईज राहत, असा दावा त्यांनी केला होता. उषा ठाकूर यांचा व्हिडिओ काही नेटकऱ्यांनी सोशल मिडियावरील फेसबुकवर शेअर केला आहे. (BJP ministers worship at airport to get rid of Corona)

West Bengal Election 2021: हिंसाचारावरून ममता बॅनर्जी यांच्यावर नरेंद्र मोदींचा...

दरम्यान, ठाकूर बाईंचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी टिकेची झोड उटवली. तसेच, विमानतळावर सुरक्षाव्यवस्था एकदम कडक असतानाही तिथे पूजा करण्याची परवानगी कशी काय देण्यात आली, अशी विचारणा देखील करण्यात येऊ लागली आहे. 

 

संबंधित बातम्या