भाजप आमदाराने डॉक्टरांना घरीच बोलावून घेतली कोरोनाची लस

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 13 एप्रिल 2021

बिहारमधील भाजपच्या एका आमदारानं चक्क घरीच डॉक्टरांना बोलावून स्वत:चे लसीकरण करुन घेतल्याचे समोर आले आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागल्यामुळे मोठ्यासंख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत.  तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लस महोत्सव साजरा करण्याचे आवाहन राज्यांना केलं आहे. कोरोना लसीकरणासाठी नागरिक पहाटेपासून लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावून तासंतास उभे असल्याचे पहायला मिळत आहे. तर अनेक ठिकाणी लशीच्या तुटवड्यामुळे नागरिकांना लस देखील उपलब्ध होत नसल्याचे समोर येत आहे. मात्र असं असताना बिहारमधील भाजपच्या एका आमदारानं चक्क घरीच डॉक्टरांना बोलावून स्वत:चे लसीकरण करुन घेतल्याचे समोर आले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित भाजपच्या आमदारांवर सर्वचस्तरामधून जोरदार टिकेचा सामना करावा लागत आहे. (BJP MLA calls doctors at home and administers corona vaccine)

कुंभमेळ्यात 102 भाविक कोरोना पॉझिटिव्ह

केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच लसीकरणाबाबतच्या नियमांचे भंग केल्याप्रकरणी राजकीय वर्तुळातून जोरदार टीकेला सामोरं जावं लागत आहे. घरीच लस घेतलेल्या आमदाराचे नाव अशोक सिंग असून मुजफ्फरपूरमधील पारु मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर न जाता डॉक्टरांनाच स्वत:च्या घरी बोलावून घेतले होते. यापूर्वी मार्च महिन्यामध्ये कर्नाटकचे कृषीमंत्री बी.सी पाटील यांनी घरीच संपूर्ण कुटुंबासमवेत लस घेतल्याचा प्रकार समोर आला होता. तेव्हा केंद्रीय आरोग्य विभागाने त्याबाबत दखल घेत, कर्नाटक सरकारकडून या संबंधीचा अहवाल मागवून घेतला होता. 

 

संबंधित बातम्या