Jaipur: 'माझं नाव लक्षात ठेवा'...भाजप खासदाराची डीएसपींवर अरेरावी, व्हिडिओ व्हायरल

चार कामगारांना ताब्यात घेतल्याबद्दल बेहरोर डीएसपींना बोलताना बालकनाथ यांचा संयम सुटला
Jaipur
JaipurDainik Gomantak

भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार महंत बालकनाथ योगी यांचा राजस्थानमधील अलवरमधील डीएसपीला धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चार कामगारांना ताब्यात घेतल्याबद्दल बेहरोर डीएसपींना बोलताना बालकनाथ यांचा संयम सुटला. त्यांनी डीएसपी आनंद राव यांना गणवेशातील गुंड असेही म्हटले. 'माझे नाव लक्षात ठेवा... हे फक्त 8 महिन्यांचे सरकार आहे, मग भाजप येणार आहे. मी तुला येथून जाऊ देणार नाही.' असा सज्जड दम भाजप खासदाराने भरला.

Jaipur
Dabolim Airport: गोव्यात येणाऱ्या विमानात बॉम्ब? फ्लाईट जामनगरला वळवली, दाबोळीवर हाय अलर्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा जानेवारीला हिस्ट्रीशीटर विक्रम गुर्जर उर्फ ​​लादेनवर गोळीबार झाला होता. पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात बेहरोड येथे नेले. गोळीबारात लादेन बचावला, मात्र उपचारासाठी तेथे आलेल्या इमरती देवी आणि भुतेरी देवी यांच्या पायाला गोळी लागली. या प्रकरणावरून पोलिसांनी रविवारी सकाळी काँग्रेस कार्यकर्ते अधिवक्ता राजाराम यादव, भाजप कार्यकर्ता अधिवक्ता हितेंद्र यादव, नूतन सैनी आणि निशांत यादव यांना ताब्यात घेतले. गोळीबाराच्या घटनेशी त्यांचा संबंध असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

Jaipur
Raigad: धक्कादायक! रायगडच्या काशिद समुद्रात 4 विद्यार्थी बुडाले, दोघांचा मृत्यू

महंत बालकनाथ यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आत यावरून राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसने खासदार बालकनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकारणी किंवा लोकप्रतिनिधींनी असे वागू नये, असे काँग्रेस प्रदेश प्रवक्ते स्वर्णिम चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी कोणत्याही पक्षाचे नसतात. त्यांना अशी वागणूक देऊ नये. असेही चतुर्वेदी म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच भिवडीचे एसपी शंतनू कुमार सिंह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी खासदार व इतर नेत्यांशी बोलून प्रकरण शांत केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com