भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांनी चुकवलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 मे 2021

वीर सावरकर हे भारतीय जनता पक्षासाठी नेहमीच वंदनीय राहिले आहेत.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर(Vinayak Damodar Savarkar) यांची आज 188 वी जयंती पार पडली. सावरकरांच्या  जयंतीनिमित्त सोशल मिडियावरील ट्विटरवरुन त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येत आहे. वीर सावरकर हे भारतीय जनता पक्षासाठी नेहमीच वंदनीय राहिले आहेत. हिंदुत्वावादी त्यांच्याकडे आपले वैचारिक अधिष्ठान म्हणून पाहतात. कॉंग्रेसकडून यांसंदर्भात टीका झाल्यानंतर भाजप पक्ष सातत्याने सावरकरांची बाजू घेतो. (BJP national president JP Nadda missed Savarkars name)

''स्वातंत्र्याच्या लढ्यातील महान सैनिक आणि राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंती निमित्त कोटी कोटी नमन!" अशा शब्दात  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi)  अभिवादन केले. मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (Jagat Prakash Nadda)  यांनी या संदर्भात केलेले ट्विट सध्या चांगलंच चर्चेलं जात आहे. नड्डा यांनी सावरकरांना अभिवादन करताना चक्क सावरकरांचे नाव चुकवले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करण्याऐवजी दामोदर सावरकर म्हणजेच त्यांच्या वडिलांना अभिवादन केलं आहे. त्यांच्या या चुकीवरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.

मोदी सरकारची मोठी घोषणा! कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या 67 पत्रकारांच्या कुटुंबाला...

जे. पी. नड्डा यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, ''महान क्रांतीकारी तसेच प्रखर देशभक्त, चिंतक, विचारक, लेखक, दार्शनिक तसेच साहित्यकार स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त शत् शत् नमन!''  राष्ट्राप्रती समर्पण करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर युगानुयुगे प्रेरणादायी राहतील, असं त्यांनी म्हटलं आहे.  मात्र त्यांनी वीर सावरकरांचे नाव चुकवले आहे. 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर'  असं म्हणण्याऐवजी त्यांनी 'दामोदर सावरकर' म्हटल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे.

संबंधित बातम्या