उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषीच्या पत्नीला भाजपकडून उमेदवारी

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

संगीता सेनगर या फतेहपूर चौरासी त्रियतामधून निवडणूक लढवणार आहेत.

उन्नाव: उन्नाव बलात्कारातील आरोपी कुलदीप सेनगरच्या पत्नीला भाजपने निवडणूकीचं तिकीट दिलं आहे. संगीता सेनगर या भाजपच्या तिकीटावर उत्तरप्रदेशातील पंचायत निवडणूक लढवणार आहेत. संगीता सेनगर यांच्याकडे उन्नाव जिल्हा पंचायतीचं अध्यक्षपद होतं. संगीता सेनगर या फतेहपूर चौरासी त्रियतामधून निवडणूक लढवणार आहेत.

भाजपकडून कुलदीप सेनगर हे आमदार होते. उन्नाव बलात्कार प्रकरणामध्ये नाव आल्यानंतर भाजपने त्यांची हकालपट्टी केली होती. उत्तरप्रदेशातील पंचायत निवडणूका चार टप्प्यात पार पडणार आहेत. 15 एप्रिलपासून पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार असून 2 मे रोजी निवडणूकीचे निकाल जाहीर केले जातील. भाजपने गतवर्षी कुलदीप सेनगर यांना पक्षातून बडतर्फ केल्यानंतर त्यांच विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. (BJP nominates wife of convict in Unnao rape case)

राकेश्वर सिंग यांनी सांगितली नक्षलींच्या ताब्यात असतानाची कहाणी

बलात्कार पिडीतेच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणात न्यायालयाने कुलदीप सेनगर यांना दोषी ठरवून 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्याचबरोबर 10 लाखांचा दंडही न्य़ायालयाने ठोठावला होता. या बलात्कार प्रकरणामध्ये आपला कोणताही सहभाग नसल्याचा दावा कुलदीप सेनगर यांनी केला होता. दरम्यान 2017 मध्ये उन्नाव बलात्कार प्रकरणामध्ये न्यायालयाने कुलदीप सेनगर यांना आधीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली  होती. 
 

संबंधित बातम्या