बिहारच्या विकासात भाजपही वाटेकरी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

नितीश यांना श्रेय न जाऊ देण्याची खबरदारी

पाटणा: बिहारमध्ये तीन दिवसांत ९०० कोटी रुपयांपेक्षा अधिक योजनांचे भूमिपूजन आणि उदघाटन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या विकासाचे सारे श्रेय केवळ मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाच जाऊ नये, याची खबरदारी घेतली.

पाटण्यात आज मोदी यांनी योजना पाटणा, मुजफ्फरपूर, मुंगेर व छपरातील ‘नमामि गंगे’शी संबंधित ५४३ कोटी रुपयांच्या योजनेचे उदघाटन मंगळवारी केले. पंतप्रधानांचे सर्व कार्यक्रम व्हर्चुअल होत आहे. आता येत्या १८, २१ व २३ या तारखांनाही त्यांचे कार्यक्रम होणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांच्या विकास कामांचे उदघाटन ज्या वेगाने होत आहे, त्यावरून बिहारच्या विकासाचे श्रेय भाजप घेऊ पाहत आहे, हे अधोरेखित होते. 

संबंधित बातम्या