''भाजपा गुंड,चोर आणि खोटरड्या लोकांनी भरलेला पक्ष''

''भाजपा गुंड,चोर आणि खोटरड्या लोकांनी भरलेला पक्ष''
mamta banarjee.jpg

पश्चिम बंगाल : पश्चिम  बंगालच्या विधानसभा निवडणुकांना काही तासच शिल्लक राहिले आहेत. प्रचारसभांचा जोर वाढला आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे. पश्चिम मेदिनीपुरातील डेबरा याठिकाणी आयोजित प्रचारसभेत त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर निशाणा साधला. 

भाजपा दंगल घडवून आणते, तिच्यापासून सावध रहा. मी सुद्धा एक हिंदू आहे, पण माझा विश्वास मला सहनशीलता आणि प्रेमाची शिकवण देतो. तिरस्कारची नाही. लोकशाही म्हणजे काय हे त्यांना ठाऊक आहे का?, असा खोचक सवाल यावेळी ममता बॅनर्जी यांनी विचारला. याचवेळी ममता बॅनर्जी यांनी बोलताना भाजपाला गुंड आणि चोरांनी भरलेला पक्ष असल्याचाही आरोप केला. 

भाजपने इतके दुष्कर्म केले आहेत की एक दिवस ते नक्की या दुष्कर्माची भरपाई करतील. त्यांच्या बँक खात्यात किती पैसे आहेत हे त्यांना विचारा. यातूनच त्यांचा हेतू स्पष्ट होईल. ते दलितांवर हल्ला करतात, महिलांचा अपमान करतात. त्यांनी शेतकऱ्यांना लुटले. ते देश विकायला निघाले आहेत. त्यांचा पक्ष गुंड, चोर व खोटरड्या लोकांनी भरलेला असल्याचा आरोप यावेळी ममता बॅनर्जी यांनी केला. 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये 27 मार्चपासून पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. यातील 30 जागांवर शुक्रवारी मतदान होणार आहे. दुसर्‍या टप्प्यात चार जिल्ह्यांतील 30  विधानसभा जागांवर १ एप्रिल रोजी मतदान होणार आहेत. तर तिसर्‍या टप्प्यात 31 विधानसभा जागांसाठी 6 एप्रिल रोजी, 
चौथ्या टप्प्यात 44 जागांसाठी 10 एप्रिल रोजी पाच जिल्ह्यांत  मतदान  होणार आहे.

पाचव्या टप्प्यात 17 एप्रिल रोजी सहा जिल्ह्यांतील 45 जागांवर, सहाव्या टप्प्यात  22  एप्रिल रोजी 43 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडेल. त्याचबरोबर, सातव्या टप्प्यात पांच जिल्ह्यात 26 एप्रिल रोजी 36 जागांवर आणि आठव्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी  35 जागांसाठी मतदान होणार आहे. या सर्व निवडणुकांचा निकाल 2 मे रोजी लागणार आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com