Loksabha Election: दक्षिणेसाठी भाजपची खास रणनीती, 60 जागांचे लक्ष्य; तेलंगणावर...

BJP Plan For Loksabha Election: 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी दीड वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे.
PM Modi
PM ModiDainik Gomantak

BJP Plan for Loksabha Election: 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी दीड वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. उत्तर भारतात मजबूत स्थितीत असलेल्या भाजपने दक्षिणेकडील राज्यांवरही लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने दक्षिणेत 60 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पक्षाचे अधिक लक्ष तेलंगणावर आहे.

वास्तविक, तेलंगणात या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) 7 जानेवारी रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तेलंगणातील 119 विधानसभा बूथ स्तरावरील अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांशी संपर्क साधणार आहेत.

PM Modi
Assembly Elections: 2024 पूर्वी 9 राज्यांमध्ये निवडणुका, विरोधकांना एकत्र करु शकतील का राहुल गांधी?

तसेच, सर्वजण आपापल्या केंद्रांवरुन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कनेक्ट होतील आणि प्रत्येक बैठकीला सुमारे तीन ते चार हजार लोक उपस्थित राहतील. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, पक्ष तेलंगणातील केसीआर सरकार उलथून टाकण्याच्या तयारीत आहे. त्यामुळेच तेलंगणात भाजप एकापाठोपाठ एक कार्यक्रम करत आहे. तेलंगणासाठी भाजपने अनेक महत्त्वाचे कार्यक्रम आणि योजना आखल्या आहेत. लोकसभेपूर्वी आगामी विधानसभा निवडणुकांवरही भाजपचे लक्ष आहे.

भाजपने सुरु केले 'मिशन 90'

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या एका सूत्राने सांगितले की, ही बैठक खूप महत्त्वाची आहे. परिषदेत तेलंगणावर चर्चा होईल, निवडणुकीची रणनीती ठरवली जाईल, कार्यकर्त्यांची तयारी केली जाईल. काही दिवसांपूर्वी तेलंगणात (Telangana) झालेल्या प्रशिक्षण शिबिरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिशन दक्षिण अंतर्गत 'मिशन 90' हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. पहिल्या तीन महिन्यांत वेगळा कार्यक्रम असेल, त्यानंतर प्रत्येक गावात चौपालांसह छोटे छोटे कार्यक्रम होतील. केसीआर सरकारच्या उणिवा, भ्रष्टाचार आणि घराणेशाही यासह मोदी सरकारने जनतेच्या हितासाठी आणलेल्या विविध योजनांचा समावेश करण्यात येणार आहे.

PM Modi
Rahul Gandhi: पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी योग्य आहेत का? नितीश कुमार म्हणाले...

भाजपचे अधिक लक्ष तेलंगणावर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रामुख्याने तेलंगणा, नंतर तामिळनाडू, तिसरे आंध्र प्रदेश आणि चौथे केरळ यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कर्नाटकात सध्या भाजपचे सरकार आहे. दक्षिणेत विविध ठिकाणी लोकसभेच्या सुमारे 60 जागांचे लक्ष्य घेऊन ते सुरु आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये आयोजित प्रशिक्षण शिबिरात भाजप कार्यकर्त्यांना पुढील एक वर्षात दक्षिणेत पक्ष मजबूत करण्याचे टार्गेट देण्यात आले आहे, जेणेकरुन 2024 पर्यंत भाजप दक्षिणेत जास्तीत जास्त जागा जिंकू शकेल.

PM Modi
Rahul Gandhi ची भगवान रामाशी तुलना, कॉंग्रेस नेत्यावर भडकले मामा सरकारमधील गृहमंत्री

सूत्राने पुढे सांगितले की, जर भाजपला 2024 मध्ये 303 पेक्षा जास्त जागा मिळवायच्या असतील तर दक्षिणेकडील जागांना नियोजनबद्ध पद्धतीने लक्ष्य करावे लागेल आणि आता भाजपने त्यासाठी काम सुरु केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com