भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; अडवाणींनाही मिळालं स्थान

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani), डॉ.मुरली मनोहर जोशी,यांचा यात समावेश करण्यात आला आहे.(BJP)
भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; अडवाणींनाही मिळालं स्थान
BJP President announces new team of BJPDainik Gomantak

देशातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपने (BJP) आपली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (JP Nadda) यांनी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नवीन टिमची (BJP New Team) घोषणा केली आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani), डॉ.मुरली मनोहर जोशी, माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह(Rajanth Singh), अमित शहा (Amit Shah), नितीन गडकरी (Nitin Gadkari), राज्यसभेतील सभागृह नेते, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि सर्व राष्ट्रीय अधिकारी यांचा यात समावेश करण्यात आला आहे. (BJP President announces new team of BJP)

भाजपच्या या नव्या राष्ट्रीय कार्य समितीमध्ये 50 विशेष आमंत्रित आणि 179 कायमस्वरूपी आमंत्रित असतील. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध विधानसभा आणि विधान परिषदेत विधिमंडळ पक्षाचे नेते, माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रीय आघाडी अध्यक्ष, राज्य प्रभारी सह-प्रभारी प्रदेशाध्यक्ष सामील करण्यात आले आहेत.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकूण 309 सदस्य घोषित करण्यात आले आहेत. यावेळी मनेका गांधी यांचे नाव कार्यकारी समितीमध्ये नाही. रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, हर्षवर्धन यांची नावे समाविष्ट आहेत. त्याचबरोबर पक्षाचे सर्व पदाधिकारी, मोर्चांचे अध्यक्ष, सर्व प्रवक्ते, सर्व राज्यांचे अध्यक्ष यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

BJP President announces new team of BJP
लखीमपूर खेरी प्रकरणाची निवृत्त न्यायमूर्ती प्रदीप कुमार श्रीवास्तव करणार चौकशी

खरं तर, भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी ही पक्षाची एक प्रमुख विचारवंत संघटन असणार आहे, जी सरकारला भेडसावणाऱ्या प्रमुख समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि संघटनेच्या अजेंड्याला आकार देण्यासाठी कार्यरत असेल.

आज जाहीर करण्यात आलेल्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये भाजपकडून अनेक बदल करण्यात आले आहेत. बाहेरून भाजपमध्ये आलेल्या अनेक नेत्यांना या नव्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. मात्र भाजपच्या अनेक जुन्या नेत्यांना यावेळी यादीत स्थान मिळू शकले नाही. मेनका गांधी आणि वरुण गांधी या दोघांनाही कार्यकारिणीतून वगळण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.