‘’भाजपने हिंदुत्वाचा खेळ माझ्याबरोबर खेळू नये’’

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 9 मार्च 2021

'भाजपने माझ्य़ासोबत हिंदुत्वाचा खेळ खेळू नये' असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधला.

नंदीग्राम: आगामी काळात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर तृणमुल कॉंग्रेस आणि भाजप यांच्यातील पश्चिम  प्रचार जहरी बनला आहे. दोन्ही पक्ष सत्तेत येण्यासाठी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी नंदीग्राममधील प्रचारसभेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी भाजपला ठणकावून सांगितलं की, 'आपण एक हिंदू मुलगी आहे'.

पश्चिम बंगालमध्ये 27 मार्च ते 29 एप्रिल या काळात विधनसभा निवडणूका आठ टप्प्यात होणार आहेत. ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणूकीत भवानीपुर हा आपला हक्काचा मतदारसंघ सोडून नंदीग्राममधून भाजप नेते सुवेंन्दु अधिकारी यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत.

अभिनेते मिथुन चक्रवर्तींचा भाजपमध्ये प्रवेश; म्हणाले..'मी कोब्रा आहे'

ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधीत करताना चंडीपाठ या धार्मिक लेखातील मंत्राचे पठण केले. ''मी रोज घरातून बाहेर पडताना चंडीपठाचे उच्चारण करते,'' असं ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'भाजपने माझ्य़ासोबत हिंदुत्वाचा खेळ खेळू नये' असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधला.

या आगोदर ममता बॅनर्जी यांचे सरकार पश्चिम बंगालमध्ये मुसलमानांसाठी झुकते माफ देते, असा आरोप भाजपने ममता बॅनर्जी यांच्यावर केला होता. या आरोपाचा निषेध करत ममता म्हणाल्या, ''मी सुध्दा एक हिंदू मुलगी आहे. माझ्यासोबत भाजपाने हिंदुत्वाचा खेळ खेळू नये. मला सांगा एक चांगला हिंदू कसे बनता येतं ते तुम्ही मला सांगा?'' ममता बॅनर्जी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची शक्यता आहे.

 
 

संबंधित बातम्या