"तालिबानी विचारसरणी": करौली हिंसाचारावरुन भाजपने गेहलोत सरकारवर साधला निशाणा

माजी केंद्रीय मंत्री आणि राजस्थानचे भाजप खासदार राज्यवर्धन राठोड (Rajyavardhan Rathore) यांनी राज्य सरकार ‘तुष्टीकरण आणि ध्रुवीकरणाचे राजकारण’ करत असल्याचा आरोप केला आहे.
Ashok Gehlot
Ashok GehlotDainik Gomantak

राजस्थानमधील करौली येथील जातीय हिंसाचारावर अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस (Congress) सरकारवर 'तालिबानी विचारसरणी' आणि तुष्टीकरण करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि राजस्थानचे भाजप खासदार राज्यवर्धन राठोड (Rajyavardhan Rathore) यांनी राज्य सरकार ‘तुष्टीकरण आणि ध्रुवीकरणाचे राजकारण’ करत असल्याचा आरोप केला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, 'गेल्या शनिवारी हिंदू नववर्ष 'नव संवत्सर' निमित्त काढलेली मोटारसायकल रॅली मुस्लिमबहुल भागातून जात असताना त्यावर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेत बरेच लोक आणि आठ पोलिस जखमी झाले आहेत. या हिंसाचारात (Violence) अनेक दुकाने आणि गाड्याही जाळण्यात आल्या होत्या.

Ashok Gehlot
राज्यपाल मलिक पुन्हा कडाडले, 'मी पद सोडू शकतो, पण शेतकऱ्यांचे नुकसान बघणार नाही"

दरम्यान, रॅलीत सुमारे 400 लोक 200 बाईकवर स्वार होते. दुसरीकडे, पोलिसांचे म्हणणे आहे की, जेव्हा मिरवणूक संवेदनशील भागातून जात होती, तेव्हा त्यात सहभागी झालेल्या लोकांनी प्रक्षोभक घोषणा दिल्या. त्यानंतर जमावाने दगडफेक केली. या धार्मिक मिरवणुकीच्या काही दिवसांपूर्वी काही घरांच्या छतावर दगड गोळा करुन ठेवण्यात आले होते, याकडे मात्र करौली पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे राठोड म्हणाले. भाजप खासदार म्हणाले, 'राजस्थानमध्ये जिथे 36 समुदाय राहतात, तिथे राज्य सरकार तालिबानी विचारसरणीने काम करत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे...करौलीमध्ये काय घडले, ते पोलिसांना कळले नाही की, ते डोळे मिटून घेत आहेत?

Ashok Gehlot
"मी शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करायला घाबरणार नाही": राज्यपाल सत्यपाल मलिक

ते म्हणाले, 'घटनेला सात दिवस उलटून गेले तरी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. आमच्या पक्षाचे नेते तिथे गेले आणि ते गेल्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला. हे पूर्णपणे तुष्टीकरणाचे राजकारण आहे. दुसरीकडे, राजस्थान पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. राजस्थानचे (Rajasthan) पोलिस प्रमुख मोहनलाल लाथर म्हणाले, 'कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. तपासादरम्यान 23 जणांना अटक करण्यात आली असून 44 जणांची ओळख पटली आहे. पोलिसांचे असेही म्हणणे आहे की, ''मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांनी जाणीवपूर्वक प्रक्षोभक घोषणा दिल्या ज्यामुळे हाणामारी झाली. भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले की, अशा हिंसेला सुसंस्कृत समाजात स्थान नाही.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com