मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांच्या बाबत भाजपने घेतला यू टर्न 

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 4 मार्च 2021

केरळ राज्याच्या विधानसभेची निवडणूक लवकरच होणार आहे.

केरळ राज्याच्या विधानसभेची निवडणूक लवकरच होणार आहे. आणि या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आज मट्रोमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ई. श्रीधरन यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले होते. मात्र आता भाजपने त्यांचे नाव मागे घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. ई. श्रीधरन यांनी नुकतेच राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. व ते मागील आठवड्यात भाजप मध्ये दाखल झाले होते. केरळमधील भाजपचे प्रमुख के. सुरेंद्रन यांनी विजय यात्रेदरम्यान श्रीधरन यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आल्याची माहिती दिली होती. व तसेच अन्य उमेदवारांची देखील नावे लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. 

ऑगस्टा वेस्टलँड : गौतम खेतानला न्यायालयाचा दिलासा; ईडीची याचिका फेटाळली   

याशिवाय, केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी आज सोशल मीडियावरील ट्विटरवर केरळ मध्ये भाजप मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून ई. श्रीधरन यांच्यासमवेत निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले होते. तसेच केरळमधील जनतेला भ्रष्टाचारमुक्त, विकासाभिमुख शासन देण्यासाठी सीपीएम आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांचा पराभव करणार असल्याचे त्यांनी पुढे आपल्या ट्विट मध्ये लिहिले होते. परंतु त्यानंतर मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून पक्षाने ई. श्रीधरन यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्याचे समजले. व याबाबत पक्षाच्या प्रमुखांशी चौकशी केली असता, अशी कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्याचे  व्ही. मुरलीधरन यांनी सांगितले. 

मुरलीधरन हे केंद्र सरकारचे राज्यमंत्री आहेत. आणि मुरलीधरन यांनी याअगोदर एका मुलाखतीत ई. श्रीधरन यांच्या अनुभवामुळे भाजप राज्यात आणखी प्रगती करेल. व वयाच्या 85 व्या वर्षीही ते तंदुरुस्त असल्याचे म्हटले होते. तर 21 फेब्रुवारीला कासारगोड येथे झालेल्या विजय यात्रेवेळी ई श्रीधरन यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आपण आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता केरळमध्ये यावी यासाठीच राजकारणात उतरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते. आगामी निवडणुकीत केरळमध्ये भाजपला सत्ता मिळाल्यास मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळून राज्याच्या हिताची कामे करू, असंदेखील ते म्हणाले होते. यानंतर राज्यपालांसारख्या 'घटनात्मक' पदावर काम करण्यात रस नसल्याचे सांगताना,आपल्या राजकीय अजेंड्यात केरळवर असलेले कर्ज नाहीसे कऱणे, राज्यातील पायाभूत सोयीसुविधांचा विकास करणे या गोष्टी असल्याचे त्यांनी नमूद केले होते.      

संबंधित बातम्या