'पश्चिम बंगालमध्ये भाजपने तिहेरी आकडा गाठल्यास प्रसिद्ध रणनितीकार प्रशांत किशोर ट्विटर सोडणार'

वृत्तसंस्था
सोमवार, 21 डिसेंबर 2020

आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि ममता बॅनर्जींमध्ये आरेप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकड्यावरच समाधान मानावे लागेल, असे वक्तव्य केले आहे.

कोलकाता : आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि ममता बॅनर्जींमध्ये आरेप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकड्यावरच समाधान मानावे लागेल, असे वक्तव्य केले आहे. अमित शहांच्या दौऱ्यापासून भाजपने पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर निवडणूकीच्या तयारीला सुरूवात केली आहे.

सध्या प्रशांत किशोर हे तृणमुल कॉंग्रेससाठी काम करत आहेत. आज प्रशांत किशोर यांनी ट्विट करत भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. काही मिडिया चॅनल्स भाजपचाच प्रचार करत आहेत, असे असूनदेखील भाजपला पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत संघर्ष करावा लागणार असल्याचे म्हटले आहे. एवढं बोलूनच ते थांबले नाही, तर 'असं झालं नाही तर मी ट्विटर सो़ेडेन, माझं हे ट्विट माध्यमांनी सेव्ह करून ठेवावं', असंदेखील त्यांनी लिहिलं आहे.

 

 

संबंधित बातम्या