भाजप कार्यकर्त्यांकडून मिठाईचे वाटप

PTI
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांकडून पक्ष कार्यालयात तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.

श्रीनगर

काश्‍मीरमधून कलम ३७० हटविल्याच्या निर्णयास एक वर्ष पूर्ण झाल्याबद्धल आज भाजपच्या वतीने मिठाईचे वाटप करत आनंद व्यक्त करण्यात आला. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांकडून पक्ष कार्यालयात तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.
भाजपचे नेते अल्ताफ ठाकूर म्हणाले की, भविष्यात जम्मू काश्‍मीरमध्ये सकारात्मक बदल होतील. चकमकीच्या वेळी राज्यात दगडफेकीच्या घटना व्हायच्या, तेथे पाकिस्तान, इसिसचे झेंडे असायचे. आता ते सर्वच थांबले आहे. याचा आम्ही आनंद व्यक्त करत आहोत. काही राजकीय नेत्यांनी आज दिवस ‘काळा दिवस’ असल्याचे म्हटले आहे. ते इसिस समर्थक असावेत, असे ठाकूर यांनी नमूद केले. जर कोणी काळा दिवसाचे समर्थन करत असतील तर ते इसिसचे पाठिराखे आहेत. आपण कशाचे समर्थन करत आहोत, याचा त्यांनी विचार करायला हवा.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या