UP CM Yogi Adityanath
UP CM Yogi Adityanath Dainik Gomantak

UP Election 2022 : यूपीत भाजप जिंकली; तरीही तीन जागी झाले डिपॅाझिट जप्त

UP Election 2022 : यूपीत भाजपच्या तीन उमेदवारांचे डिपॅाझिट जप्त

UP Election 2022 : देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकीवेळी उत्तर प्रदेशमध्ये काटे की टक्कर पहायला मिळाली. येथे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पक्षामध्ये थेट लढत होती. सगळ्यात जास्त जागा जिंकत भाजप पुन्हा योगी सरकार करण्याच्या तयारीत आहे. 2022 चा विचार केल्यास भाजपने इतिहास रचत नोएडाच्या पंकज सिंग यांनी विक्रमी मते घेतली. जी देशातील सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम आहे.

यापूर्वी हा विक्रम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या नावावर होता. त्यांनी विक्रमी 1.65 लाख मते घेत विजय नोंदवला होता. तो विक्रम नोएडाच्या (Noida) पंकज सिंग यांनी मागे सोडत 1,81,513 मते घेतली. असे असताना ही निवडणूक भाजपसाठी आंबट-गोड अनुभवाची ठरली आहे. कारण या निवडणुकीत भाजपला तीन जागांवर डिपॅाझिट ही वाचवता आलेलं नाही. प्रतापगडमधील कुंडा, जौनपूरमधील मल्हानी आणि बलियामधील रसदा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. (BJP's deposits were confiscated in three places In UP)

कुंडा येथील राजा भैय्यासमोर सिंधुजाची डिपॅाझिट जप्त

यूपीमध्ये झालेली ही हायहोल्टेज निवडणूक होती. पण, कुंडा येथील निवडणूक राजा भैया विरुद्ध सपा अशीच राहिली. यावेळी समाजवादी पक्षाने गुलशन यादव यांना या जागेवरून उमेदवारी दिली. राजा भैया यांनी हा राजकीय (Political) सामना जिंकला. आणि गुलशन यादव यांच्यासह सिंधुजा मिश्रा यांचा पराभव झाला. गुलशन यादव यांचा 30,315 राजा भैया यांनी मतांनी पराभव केला. राजा भैया यांना 50.58 टक्के मते मिळाली. त्याचवेळी गुलशन यादव यांना 35.19 टक्के मते मिळाली. भाजपच्या सिंधुजा मिश्रा यांना केवळ 8.36 टक्के मते मिळाली. भाजपच्या खात्यात 16,347 मते पडली. त्यामुळे सिंधुजा आपली डिपॅाझिट ही वाचवू शकले नाहीत.

केपी ही वाचवू शकले नाहीत आपली डिपॅाझिट

माल्हनी विधानसभेच्या जागेवरही भाजपचा दारुण पराभव झाला. येथे भाजपचे उमेदवार कृष्ण प्रताप सिंह केपी यांना चौथे स्थान मिळाले आहे. या जागेवर एकूण 12 उमेदवारांनी नशीब आजमावले. मुख्य लढत समाजवादी पक्षाचे (SP) लकी यादव आणि जेडीयूचे धनंजय सिंह यांच्यात होती. लकी यादव यांनी 97 हजार 357 मते मिळवून धनंजय सिंह यांचा पराभव केला. ही जागा जिंकण्यासाठी पक्षाने पूर्ण जोर लावला होता. येथे सपाचे संरक्षक मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) मते मागण्यासाठी पोहोचले होते. त्याचा परिणाम दिसून आला.

जेडीयूचे (JDU) धनंजय सिंह यांना 79 हजार 830 मते मिळाली आणि ते दुसऱ्या स्थानावर राहिले. बसपचे शैलेंद्र यादव 24,007 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर भाजपचे उमेदवार केपी यांना केवळ 18 हजार 319 मते मिळाली. एकूण मतदानाच्या केवळ 8.01 टक्के होते. निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर राहून त्यांनी आपली अनामत रक्कम गमावली.

UP CM Yogi Adityanath
विदेशातील भूमिपुत्रांमुळेच ‘आरजी’च्या मतांत वाढ?

रसरामध्ये भाजप तिसऱ्या क्रमांकावर

बलियाच्या रसरा विधानसभा जागेवर भारतीय जनता पक्ष तिसऱ्या क्रमांकावर राहीला. मुख्य लढत बहुजन समाज पक्ष आणि भारतीय समाज पक्ष यांच्यात होती. बसपचे उमाशंकर सिंह ८७,८८७ मते मिळवून विजयी झाले. दुसरीकडे सुभाषसपचे महेंद्र 81,304 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर. बसपाच्या (BSP) उमेदवाराला 43.82 टक्के मते मिळाली.

त्याच वेळी, सुभाषपाच्या उमेदवाराला 40.54 टक्के मते मिळाली. भाजपच्या बब्बन यांना केवळ 24,235 मते मिळाली. ते एकूण मतांच्या 12.08 टक्के इतके होते. यामुळे त्यांना या जागेवर पराभव पत्कारा लागला. वास्तविक, कोणत्याही विधानसभेच्या जागेवर अनामत रक्कम वाचवण्यासाठी 16.66 टक्के मते मिळणे आवश्यक आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपच्या ५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

2017 च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) पक्षाला जवळपास 39 टक्के मते मिळाली होती. त्यावेळी भाजपला 41.3 टक्के मते मिळाली होती. यावेळी यात सुधारणा झाल्याचे जानवत आहे. तर समाजवादी पक्षाचेही (Samajwadi Party) मताधिक्य वाढले आहे. तसेच भाजपच्या (BJP) मित्रपक्षांची मतांची टक्केवारी वाढली आहे.

या निवडणुकीत अपना दल (एस) आणि निषाद पक्षाने आपली मते तसेच जागा वाढवल्या. मात्र, 2017 च्या तुलनेत यावेळी भाजपकडून डिपॉझिट (Deposit) गमावलेल्या उमेदवारांची संख्या कमी झाली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपच्या ५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com