West Bengal Election : भाजपने जाहीर केले 'संकल्प' पत्र; सत्ता आल्यास CAA लागू करणार

Amit Shaha
Amit Shaha

भारतीय जनता पक्षाने आज पश्चिम बंगालच्या विधानसभा जिंकण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनी आज कोलकात्यात पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यास भाजपने संकल्प पत्र म्हणून नाव दिले आहे. यावेळी बंगाल भाजपचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय आणि प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. (BJPs manifesto promises to implement CAA if it comes to power in West Bengal)

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा (Amit Shaha) यांनी कोलकाता येथील पक्ष कार्यालयात पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. आणि या जाहीरनाम्यास संकल्पपत्र असे नाव देत असल्याचे सांगितले. शिवाय, आपण पुढे सोनार बांगला कसे बनवू याचा हा संकल्प असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. तसेच, पश्चिम बंगालमधील जनतेच्या अपेक्षा कशा पूर्ण करायच्या याचा विचार या संकल्प पत्रात करण्यात आल्याची माहिती अमित शहा यांनी यावेळी दिली. 

भाजपच्या संकलप पत्रातील मुद्दे -  

- पश्चिम बंगालमधील (West Bengal) साहित्य, कला, संस्कृती आणि सर्व शैलींना प्रोत्साहन देण्यासाठी 11 हजार कोटी रुपयांचा सोनार बांगला फंड सुरू करणार असल्याचे आश्वासन या संकल्प पत्रात भाजप कडून देण्यात आले आहे. 

- यानंतर, पश्चिम बंगाल मधील हिंसाचार थांबविण्यात येणार असल्याचे या संकल्प पत्रात म्हटले आहे. 

- प्रत्येक कुटूंबाला शौचालय व शुद्ध पिण्याचे पाणी दिले जाणार असल्याचे नमूद करत, नोबेल पुरस्काराच्या धर्तीवर टागोर पुरस्कार व ऑस्कर पुरस्काराच्या धर्तीवर सत्यजित रे आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुरु करणार असल्याची माहिती संकल्प पत्रात देण्यात आली आहे. 

- पश्चिम बंगालमधील सर्व कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. यानंतर बंगालला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी सीएमओ अंतर्गत भ्रष्टाचारविरोधी मदत लाइन सुरू करणार असल्याचे म्हणत, जेणेकरुन कोणताही नागरिक थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचू शकणार असल्याचे या संकल्प जाहीर नाम्यात लिहिले आहे.  

- कृषक सुरक्षा योजनेंतर्गत प्रत्येक भूमिहीन शेतकऱ्याला दरवर्षी 4,000 रुपयांची मदत, उत्तर बंगाल, जंगलमहल आणि सुंदरवन प्रदेशात 3 नवीन एम्स स्थापन करण्याचे आश्वासन भाजपने आपल्या संकल्प पत्रात दिले आहे. 

- सर्व मुलींसाठी विनामूल्य शिक्षण, सार्वजनिक वाहतुकीत सर्व महिलांसाठी विनामूल्य प्रवास आणि ओबीसी आरक्षणाच्या यादीमध्ये उरलेल्या महिस्य, तेली आणि अन्य हिंदू जमातींचा समावेश करण्याचे कामही भाजपा सरकार करणार असल्याचे आश्वसन पश्चिम बंगाल जनतेला संकल्प पत्रातून देण्यात आले आहे. 

- याशिवाय, सरस्वती पूजा व दुर्गापूजनाचा उत्सव साजरा करण्यासाठी भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर न्यायालयाच्या मदतीची गरज भासणार नसल्याचे भाजपने संकल्प पत्रात म्हटले आहे. 

- यानंतर, नागरिकत्व दुरुस्ती कायदा पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लागू करण्यात येणार असल्याचे भाजपने जाहीरनाम्यात अधोरेखित केले आहे. व मुख्यमंत्री शरणार्थी योजनेंतर्गत प्रत्येक निर्वासित कुटूंबाला पाच वर्षांसाठी डीबीटीच्या माध्यमातून 10,000 रुपये देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. 

- पश्चिम बंगालमधील प्रत्येक गरीब व्यक्तीला आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळण्यासाठी ही योजना लागू करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर, सीमा सुरक्षा दलाची स्थापना करण्यात येणार असल्याचे पुढे या संकल्प पत्रात म्हटले आहे. 

- याव्यतिरिक्त, राज्य सरकारच्या सर्व नोकऱ्यांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना लागू करण्यात येणार असल्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. 

या संकल्प पत्रानंतर बोलताना अमित शहा यांनी, बर्‍याच वर्षांपासून जाहीरनामा फक्त एक प्रक्रिया होती. मात्र जेव्हापासून भाजपा सरकारे बनू लागली, तेव्हापासून ठराव पत्राचे महत्त्व वाढू लागले असल्याचे सांगितले. शिवाय, भाजप सरकार स्थापन झाल्यानंतरच सरकारांनी ठराव पत्रावर चालण्यास सुरवात केल्याचे अमित शहा म्हणाले. त्यानंतर, संकल्प पत्रात केवळ घोषणा नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा संकलप असल्याचे ते म्हणाले.    

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com