भाजपच्या मेजवानीला सप, बसप नेत्यांची हजेरी

Dainik Gomantak
शुक्रवार, 19 जून 2020

शुक्रवारी होणाऱ्या मतदानप्रसंगी ही मंडळी भाजपच्या बाजूने मतदान करणार की नाही हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भोपाळ

राज्यसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशात घोडेबाजार तेजीत आला असून येथील भाजपच्या मुख्यालयात आयोजित डिनरपार्टीला बहुजन समाज पक्षाचे दोन, समाजवादी पक्षाचा एक आणि दोन अपक्ष आमदार उपस्थित होते अशी माहिती पुढे आली आहे. या पार्टीला मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि दोन केंद्रीयमंत्री देखील उपस्थित होते. दरम्यान शुक्रवारी होणाऱ्या मतदानप्रसंगी ही मंडळी भाजपच्या बाजूने मतदान करणार की नाही हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. केंद्रीयमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते. बसपच्या आमदार रमाबाई आणि संजीवसिंह कुशवाह, समाजवादी पक्षाचे आमदार राजेश शुक्ला आणि अपक्ष आमदार विक्रम राणा आणि सुरेंद्रसिंह शेरा एकत्र भोजन करत असल्याची छायाचित्रे सोशल मिडियात व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

संबंधित बातम्या