राकेश टिकैत यांच्या अश्रूने आणला आंदोलक शेतकऱ्यांचा "महापुर"

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 30 जानेवारी 2021

राकेश टिकैत यांचा भावनावश व्हिडीओ  पश्चिमी उत्तर प्रदेशात जोरात व्हायरल झाला आणि भावनिकतेची लाट उसळली. गाझीपूरमधील शेतकरी पुन्हा आंदोलनस्थळी एकवटण्यास सुरुवात झाली.

नवी दिल्ली: राकेश टिकैत यांचा भावनावश व्हिडीओ  पश्चिमी उत्तर प्रदेशात जोरात व्हायरल झाला आणि भावनिकतेची लाट उसळली. गाझीपूरमधील शेतकरी पुन्हा आंदोलनस्थळी एकवटण्यास सुरुवात झाली. 26 जानेवारी रोजी दिल्लीच्या सीमेवर झालेल्या हिंसाचारेने आंदोलनाची भूमिका बदलली. प्रजासत्ताक दिनी झालेल्या ट्रॅक्टर रॅलीचे हिंसक रूप धारण केले होते. लाल किल्ल्यावर धार्मीक ध्वज फडकावून शेतकरी चळवळ काही प्रमाणात कमकुवत झाली.  काल रात्री, गाझीपूर सीमेवर शेतकरी नेते राकेश टिकैत माध्यमांशी बोलताना भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले त्यांने सीमेवरुन माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्याने शेतकरी आंदोलनाला गालबोट लागले आहे. त्यानंतर शेतकरी आंदोलनात फाटाफूट निर्माण झाली. दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करुन शेतकऱ्यांना पळवून लावण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र राकेश टिकैत यांना अश्रू अनावर झाल्यानंतर रात्रीतूनच त्यांना देशभरातून पाठिंबा मिळू लागला आहे, मुझफ्फरनगरचे जिल्हाप्रमुख धीरज लाटियान म्हणाले की भारतीय किसान संघाचे नेते राकेश टिकैत यांच्या समर्थनार्थ मुझफ्फरनगरच्या सिसौली गावात 5000 हून अधिक शेतकरी बसले आहेत  

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्ली येथे ट्रॅक्टर परेड दरम्यान हिंसाचारासाठी नोंदवलेल्या  कृषी कायद्याचा विरोध करणारे शेतकरी नेत्यांमध्ये राकेश टिकैट ही होते.  उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील सिसौली हे गाव भारतीय किसान युनियनचे मुख्यालय आहे आणि संघाचे प्रमुख राकेश टिकैत व त्याचा भाऊ नरेश टिकैत यांचे मूळ गाव आहे.

ओवीसींना बिहारमध्ये झटका? -

गाझीयाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्ली-उत्तरप्रदेश सीमेवर असणारे आंदोलनस्थळं रातोरात रिकामे करण्याचे आदेश दिले होते. बुधवारपासूनच या आंदोलनस्थळावर वीज आणि पाणी बंद करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आंदोलनस्थळं रिकामे होण्याच्या मार्गी लागलेच होते तेवढ्यात राकेश टिकैत यांच्या अश्रूंनी आंदोलक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चिंगारी चेतवली आहे. पून्हा शेतकरी आंदोलनस्थळी जमायला लागले आहे.

त्यांनी असा दावा केला की पोलिसांनी बुधवारी रात्री आंदोलनस्थळी झोपलेल्या शेतकर्‍यांना काढून टाकण्यासाठी बळाचा वापर केला. पोलिसांनी त्यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. बागपतमधील दिल्ली-सहारनपूर महामार्गावर शेतकऱ्यांचा निषेध 17 डिसेंबरपासून पून्हा सुरू झाला. बुधवारी रात्री पोलिस कर्मचारी त्यांच्या तंबूत घुसले आणि झोपलेल्या शेतकर्‍यांवर लाठीमार केला.  पोलिसांनी मात्र हा दावा चर्चेच्या माध्यमातून सोडविला असल्याचा दावा केला आहे.

 

संबंधित बातम्या