Black Fungus: राजस्थानात महामारी म्हणून घोषित 

दैनिक गोमंतक
बुधवार, 19 मे 2021

आता राजधानी दिल्लीत म्यूकरमायकोसिसच्या प्रकरणांमध्येही वाढ झाली आहे. राजस्थान सरकारने कोविड 19 नंतर आता म्युकरमायकोसिस' लाही महामारी म्हणून घोषित केले आहे.

राजस्थान : देशात अद्यापही कोविड 19 मुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.  कोविड 19 च्या  दुसर्‍या लाटेदरम्यान  देशभरात रेकॉर्ड ब्रेकिंग केसेस नोंद करण्यात आली. परंतु आता गेल्या तीन दिवसांपासून कोविड 19 चे दररोजचे रुग्ण तीन लाखांहून कमी नोंदविण्यात आले आहेत.  मात्र,  आज पुन्हा कोविड 19 प्रकरणांमध्ये किंचितशी वाढ झाल्याचे समोर आले आहे. यात सर्वात दुखद बाब म्हणजे, कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेत मृत्यूने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. बुधवारी देशात कोविड 19 विषाणूमुळे 4529 रुग्णांचा मृत्यू झाला. यात  भाजपाचे आमदार गौतमलाल मीणा यांचे  कोविड 19 मिळे निधन झाले.  दरम्यान आता राजधानी दिल्लीत म्यूकरमायकोसिसच्या प्रकरणांमध्येही वाढ झाली आहे.  राजस्थान सरकारने कोविड 19 नंतर आता म्युकरमायकोसिस' लाही महामारी म्हणून घोषित केले आहे.   (Black Fungus: Declared an epidemic in Rajasthan) 

तीनशे पेक्षा जास्त कोरोना बाधितांबवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्याचा...

राजस्थानात म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) साथीचा रोग म्हणून जाहीर झाला आहे.  काळ्या बुरशीचा हा आजार धोकादायक असून त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे राजस्थानच्या गहलोत सरकारने जाहीर केले आहे.  यारोगाला बळी पडलेल्या व्यक्तीनी आपले डोळे गमावले आहेत. इतकेच नव्हे तर काहीचा जबडाही काढून टाकण्याची वेळ आली आहे. राजस्थानमध्ये काळ्या बुरशीचे 100 रूग्ण आढळून आले आहेत. त्यांच्या उपचारासाठी जयपूरच्या सवाई मानसिंग हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र वॉर्ड बनविण्यात आला आहे. तिथल्या संपूर्ण प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राजस्थानसह देशातील विविध राज्यांत कोरोना विषाणूच्या संसर्गाने बरे झालेल्या रूग्णांमध्ये म्यूकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) आजाराच्या बाबत चिंता व्यक्त केली होती.  

तर तज्ञांच्या मते, कोरोना विषाणूमुळे बरे झालेल्या मधुमेहाच्या रुग्णांमध्ये हा आजार वाढत आहे.  काळ्या बुरशीच्या  वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य वैद्यकीय व आरोग्य विभागाने बुधवारी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. राजस्थान महामारीचा अधिनियम- 2020  अंतर्गत संपूर्ण राज्यात काळी बुरशी (Black Fungus)ला  सूक्ष्म रोग म्हणून घोषित करण्यात आले आहे.  मुख्य सरकारी सचिव वैद्यकीय अखिल अरोरा यांनी जारी केलेल्या या अधिसूचनेनुसार कोविड 19  विषाणूच्या संसर्गाच्या परिणामामुळे म्यूकरमायकोसिस असलेल्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे कोविड 19 आणि त्यामुळे होणाऱ्या काळ्या बुरशीच्या आजारवर योग्य  उपचार होण्यासाठी पावले उचलली जावीत, असे सुचविण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या