मोहालीतील गुप्तचर कार्यालयाबाहेर हाय अलर्ट, सुरक्षा रक्षक तैनात

पंजाबमधील मोहाली येथील पोलिसांच्या इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयावर झालेल्या रॉकेट हल्ल्यात दहशतवादी कट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मोहालीतील गुप्तचर कार्यालयाबाहेर हाय अलर्ट, सुरक्षा रक्षक तैनात
Blast In MohaliANI

Blast In Mohali: पंजाबमध्ये काल सोमवारी पंजाब पोलिसांच्या इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयाच्या इमारतीवर रॉकेटने हल्ला करण्यात आला. ज्याने सर्वांनाच गोंधळात टाकले आहे. गुप्तचर विभागाची ही इमारत सुहाना साहिब गुरुद्वाराजवळ आहे. त्याबाबत मुख्यमंत्री भगवंत मान यांनी डीजीपींकडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे. त्याचबरोबर पंजाब पोलिसांनी आजूबाजूच्या भागात कडक बंदोबस्त ठेवला आहे. सेक्टर 77, एसएएस नगर येथील पंजाब पोलिस इंटेलिजन्स मुख्यालयाच्या बाहेर आज सकाळी कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.

Blast In Mohali
ताजमहालच्या 22 खोल्यांचं गूढ रहस्य तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या संपूर्ण प्रकरणं

सध्या मोहालीचे एसपी रविंदर पाल सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, याला दहशतवादी हल्ला मानता येईल का, असे विचारले असता, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे म्हणत त्यांनी काळजी व्यक्त केली. पंजाब पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेवर या हल्ल्यामागे दहशतवाद्यांचा कट असू शकतो, असे आम्ही चौकशी करत असताना शक्यता व्यक्त केली जात असल्याची माहिती एसपी सिंह यांनी दिली.

हल्ल्याच्या तीव्रतेमुळे कोणीही जिवीत हानी झाली नाही.कोणतेही नुकसान झाले नाही. पंजाब पोलीस आणि एफएसएल टीमचे वरिष्ठ अधिकारी याचा तपास करत असल्याचेही त्यांनी सांगितले. मोहालीमध्ये पंजाब पोलिसांच्या इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयाच्या इमारतीवर रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडने (RPG) हल्ला करण्यात आला. यादरम्यान मोठा आवाज झाला. हल्ल्यात इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. मोहाली पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, एसएएस नगरमधील पंजाब पोलिस इंटेलिजेंस मुख्यालयात संध्याकाळी 7:45 वाजता स्फोट झाला आणि या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही.

Blast In Mohali
मोहालीतील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर कार्यालयात स्फोट

दरम्यान पंजाबमधील मोहालीमध्ये सोमवारी रात्री मोहालीतील पंजाब पोलिसांच्या (Punjab Police) गुप्तचर विभागाच्या इमारतीत मोठा स्फोट (Blast in Mohali) झाला. रॉकेटसदृश वस्तू पडल्यानंतर ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली. सध्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. आजूबाजूच्या इमारतींनाही याचा फटका बसल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.