रक्तगट न जुळताही मूत्रपिंड प्रत्यारोपण

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

कोरोना काळात शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्याने अनेक रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. ‘अनलॉक’नंतर आता हळूहळू पालिका रुग्णालयात मोठ्या शस्त्रक्रियांना सुरुवात करण्यात आली आहेत

मुंबई : कोरोना काळात शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्याने अनेक रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. ‘अनलॉक’नंतर आता हळूहळू पालिका रुग्णालयात मोठ्या शस्त्रक्रियांना सुरुवात करण्यात आली आहेत. अशा वेळी पालिकेच्या मुख्य रुग्णालयांपैकी एक असलेल्या नायर रुग्णालयात रक्तगट न जुळताही म्हणजेच एबीओ पद्धतीने मूत्रपिंड प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करून एका रुग्णाला जीवदान देण्यात आले.

कोरोना संसर्गाची भीती आजही लोकांमध्ये दिसते. त्यामुळे रक्तदानासोबतच उपचार घेण्यासही रुग्ण घाबरत आहेत. परिणामी अवयवदानाची संख्या ही कमी होऊन अवयव प्रत्यारोपणाचा आकडाही घटला. मात्र अशा परिस्थितीत नायर रुग्णालयाने गेल्या पाच वर्षांपासून प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंडदात्याची वाट पाहत असलेल्या रुग्णाची यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे डायलिसिसचा खर्च या रुग्णास दीर्घ काळ परवडणारा नव्हता.

त्यामुळे समान रक्तगट नसताना ही वैद्यकीय निकषांचे पालन करून प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला.  प्रत्यारोपित करण्यात आलेला अवयव शरीराने नाकारू नये, यासाठी प्रतिकारशक्ती कमी करण्यासाठी प्लाझ्माअफेरेसिस प्रक्रियेची मदत घेण्यात आली, तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी करणाऱ्या इतर औषधांचाही वापर करण्यात आला. हे प्रत्यारोपण यशस्वी झाले असून, साडेसात महिन्यानंतर दाता आणि रुग्ण हे दोघेही सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. नायर रुग्णालयाच्या नेफ्रॉलोजी विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना मेहता यांनी आणि त्यांच्या पथकाने घेतलेली मेहनत फळाला आली असल्याचे डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

नायर रुग्णा लयाने ‘एबीओ’ पद्धतीने यशस्वी
मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. सध्या
रुग्णा ची प्रकृती स्थिर असून दाता आणि रुग्ण
हे दोघेही सुखरूप आहेत. पालि का रुग्णा लयामध्ये अशा
प्रकारच्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे अनेक गरीब रुग्णां ना
जीवदान मि ळणार आहे.
- डॉ. रमेश भारमल, अधि ष्ठाता, नायर रुग्णाल

तपासण्या करूनच निर्णय
मूत्रपिंड प्रत्या रोपणामध्ये रुग्ण व दाता या दोघांचेही रक्तगट,
तसेच आरोग्यवि षयक इतर नि कष पूरक असल्या चे सर्व
वैद्यकीय चाचण्या करून निश्चित केले जाते. यात रक्तगटाचे
साधर्म्य महत्त्वा चे असते. मात्र समान रक्तदाता उपलब्ध
न झाल्या स अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्या चा निर्ण य
तपासण्या करून घेण्या त येतो, असेही ते म्हणाले.

 

संबंधित बातम्या