बिहारमध्ये 100हून अधिक प्रवासी घेऊन जाणारी नौका बुडाली; ५ ठार, कित्येक प्रवासी गायब

बिहारमध्ये 100हून अधिक प्रवासी घेऊन जाणारी नौका बुडाली; ५ ठार, कित्येक प्रवासी गायब
bihar boat capsizes

भागलपूर- येथील नवगछिया भागात जवळपास १०० प्रवाशांनी भरलेली नौका पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. यात अनेक महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. काही प्रवासी पोहून किनाऱ्यापर्यंत पोहोचले. मात्र, अद्यापही कित्येक प्रवासी गायब असल्याचे वृत्त आहे. या नौकेमध्ये प्रवाशांबरोबरच काही सायकल आणि गाड्याही ठेवल्या होत्या. या दुर्घटनेनंतर पाच मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही अनेक प्रवासी गायब असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत ५ लोकांचा मृत्यू झाला असून १५ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, अजूनही अनेक जण गायब असल्याचे वृत्त आहे. नौकेमध्ये प्रवास करणाऱ्यांचा आकडा जवळपास १०० इतका असून यातील काही प्रवाशांना येत असल्याने ते किनाऱ्यावर सुखरूप परतले. यातील बहुसंख्य प्रवासी मजूर होते. काहींना तात्काळ रूग्णालयात हलवण्यात आले असून बाकी प्रवाशांचा शोध घेण्यात येत आहे.    

तिनटांगा करारी गावाहून लोक गंगा नदी पार करून आपल्या शेतांमध्ये मशागतीसाठी जात होते. यात महिलांचाही समावेश होता. त्यातील किनाऱ्यावर पोहोचलेल्या प्रवाशांनी सांगितले की, नौका नदीच्या मधोमध असताना भोवरीत सापडली. आणि त्यामुळे तिचा समतोल ढासळल्याने नौका अचानक पाण्यात गेली. यातील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम अद्यापही सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.   

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com