यमुना नदीत आढळता आहेत मृतदेह; कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचे असल्याचा संशय

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 7 मे 2021

स्मशान भूमी आणि कब्रस्ताना बाहेर रांगा लागलेल्या पाहायला मिळत असतानाच आता अजून एक भयानक घटना समोर आली आहे.

कोरोना (Corona) महामारीच्या या काळात कोरोना विषाणूच्या संक्रमानामुळे हजारो लोकांचे प्राण जाता आहेत. कोरोना बाधित होण्याचे, तसेच मृतांचे (Death) आकडे दिवसागणिक वाढत जाताना दिसता आहेत. स्मशान भूमी आणि कब्रस्ताना बाहेर रांगा लागलेल्या पाहायला मिळत असतानाच आता अजून एक भयानक घटना समोर आली आहे. मृत्यू झालेल्या लोकांचे मृतदेह (Deadbody) नदीमध्ये सोडल्याची घटना समोर आली आहे. तर हे मृतदेह कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचे असावेत अशी भीती स्थानिक लोकांकडून व्यक्त केली जाते आहे. (Bodies found floating in the river Yamuna in UP)

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असून या लाटेसोबतच मन हेलावून टाकणाऱ्या वगवेगळ्या घटना सुद्धा घडताना दिसता आहेत. उत्तरप्रदेशच्या कानपूर आणि हमीपुर जिल्ह्यात ग्रामीण भागात लोकांचे मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह त्यांचे मृतदेह लोकांनी यमुना नदीच्या प्रवाहात सोडल्याचे समोर आले आहे. ट्रॅक्टरमधून 2 मृतदेह आणून ते मृतदेह यमुना नदीत नदीमध्ये सोडून देण्यात आले, अशी माहिती हमीरपूरचे पोलीस अधीक्षक अनुप कुमार सिंह यांनी दिली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यापूर्वी बुधवारी आणि गुरुवारी देखील अशाच पद्धतिने या नदीमध्ये 7 मृतदेह आढळून आले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहिती नुसार, पुलावरून जात असताना काही मृतदेह दिसून येत होते. त्यामध्ये काही मृतदेह हे अर्धे जळालेल्या अवस्थेत होते. दरम्यान, स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी अनेक लोक मृतदेहाचे यमुना नदीमध्ये अंत्यसंस्कार करतात अशी माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या