राज्यसभेत भावुक झालेल्या पंतप्रधानांच्या भाषणाने बॉलिवूड अभिनेता प्रभावित

राज्यसभेत भावुक झालेल्या पंतप्रधानांच्या भाषणाने बॉलिवूड अभिनेता प्रभावित
Bollywood actor Riteish Deshmukh is impressed by the emotional speech of the Prime Minister in the Rajya Sabha

राज्यसभा: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार खासदारांचा राज्यसभा कार्यकाळ संपला आहे. कार्यकाळ सांभाळणाऱ्या खासदारांमध्ये दोन पीडीपी, एक कॉंग्रेस आणि एक भाजपाच्या खासदारांचा समावेश आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी पुन्हा एकदा राज्यसभेत भाषण केले. सभागृहात गुलाम नबी आझाद यांच्या योगदानाचा संदर्भ देताना पंतप्रधान मोदी भावूक झाले होते. पंतप्रधान मोदीजींच्या भावनांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना रितेश देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

पंतप्रधान इतके भावनिक झाले होते की त्यांनी बोलण्याचे थांबले होते.  त्यांनी आपले अश्रू पुसले आणि पाणी प्यायले आणि सॉरी म्हणत  आपल्या भाषणाला पुन्हा सुरवात केली होती. त्यांच्या या संवेदनशील भावनेबद्दल  बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांनी ट्विट केले आहे. पंतप्रधान मोदीजींच्या भावनांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना रितेश देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. "गुलाम नबी आझाद साहेबांच्या निरोप समारंभानिमित्त भाषण करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या भाषणाने मी खूप प्रभावित झालो." असे ट्विट रितेश देशमुखने केले आहे. संध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल रितेश देशमुखने केलेले हे ट्विट खूप व्हायरल होत आहे. तसेच सोशल मिडियावर युजर्सकडून यावर भाष्य केले जात आहे.

दरम्यान, गुलाम नबीचे कौतुक करीत दहशतवादी घटनेचा संदर्भ देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "गुलाम नबी जी जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा मी एका राज्याचा मुख्यमंत्री होतो. आम्ही खूप जवळ होतो. एकदा गुजरातमधील काही प्रवाशांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा त्यात 8 लोक मरण पावले होते. मला सर्वात प्रथम गुलाम नबीजींचा फोन आला होता. त्याचे अश्रू थांबत नव्हते. गुलाम नबी जी या घटनेवर सतत नजर ठेवून होते. त्यांना त्या प्रवाशांविषयी असे वाटत होते की, जणू ते त्याच्या कुटूंबाचे सदस्य आहेत. मी आझाद आणि प्रणव मुखर्जी यांचे प्रयत्न मी कधीही विसरणार नाही. प्रणव मुखर्जी त्यावेळी संरक्षणमंत्री होते. मी त्यांना सांगितले की सैन्याच्या विमानाने मृतदेह आणण्यासाठी मदत होईल, तर  काळजी करू नका, मी सगळी व्यवस्था करतो असे त्यांनी म्हटले होते. गुलाम नबी जी त्या रात्री विमानतळावर होते."

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com