Board Exam 2021: मजुरांनंतर सोनू सूदने उठवला विद्यार्थ्यांसाठी आवाज

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 12 एप्रिल 2021

कोरोना विषाणूच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमिवर बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी वाढली आहे. त्यातच आता या विषात बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने ही उडी घेतली आहे. बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने न घेण्याची मागणी सोनू सुदने केली आहे.

बोर्ड परीक्षा 2021: कोरोना विषाणूच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमिवर बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी वाढली आहे. त्यातच आता या विषात बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने ही उडी घेतली आहे. बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने न घेण्याची मागणी सोनू सुदने केली आहे. "या गंभीर परिस्थितीत विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा देण्यास भाग पडले आहे, अशा विद्यार्थ्यांची समस्या आपण समजून घ्यायला हवी," असे सांगत सोनू सूदने सोशल मीडियावर एक  व्हिडिओ अपलोड केला आहे.

देशात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. काल 1.52 लाख नवीन प्रकरणे उघडकीस आली आहेत. अशा परिस्थितीत आगामी बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी वेगाने वाढत आहे. कोरोना काळात प्रवासी मजुरांच्या मदतीसाठी आलेला बॉलिवूड कलाकार आता विद्यार्थ्यांचा आवाज म्हणून पुढे आला आहे. "मुलांच्या समस्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. ते म्हणाले की, ऑफलाइन बोर्ड परीक्षा घेण्याची ही योग्य वेळ नाही," असे सोनू सूदने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. 

Kumbh Mela 2021:  शाही स्नानासाठी झालेल्या गर्दीत कोरोना नियमांचे वाजले तीनतेरा 

सोशल मीडियावर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये सोनू सूद यांनी बोर्डाची परीक्षा ऑफलाइन मोडमध्ये घेण्यास विरोध दर्शविला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्यास काही मध्यम तोडगा काढला पाहिजे, अंतर्गत मूल्यांकन पद्धतीने विद्यार्थ्यांना बढती दिली पाहिजे, असेही तो म्हणाला आहे. यावेळी त्याने देशातील कोरोनाच्या वाढत्या घटनांवरही चिंता व्यक्त केली आहे.

बोर्ड परीक्षा रद्द करण्याबाबत प्रसिद्ध झालेल्या या व्हिडिओमध्ये सोनू सूदने अन्य देशांची उदाहरणे दिली. "सौदी अरेबियामध्ये केवळ 600 प्रकरणे असताना परीक्षा रद्द केली गेली, तर मेक्सिकोमध्ये केवळ 1300 प्रकरणांनंतर आणि कुवेत मध्ये1500 कोविड रूग्ण असतांना परीक्षा रद्द केली गेली. मात्र या देशाच्या तुलनेत भारतात एक लाखाहून अधिक प्रकरणे समोर येत आहेत, अशा परिस्थितीत सरकारने विद्यार्थ्यांच्या समस्येस गांभीर्याने समजून घेतले पाहिजे, असे मत सोनू सुदने व्हिडिओ शेअर करून व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या