पश्चिम बंगालच्या मंत्र्यावर बॉम्बहल्ला; राज्यात आज ममता विरुद्ध शहा सामना रंगणार

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

 बुधवारी रात्री पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील निमिता रेल्वे स्थानकावर काही अज्ञात हल्लेखोरांनी पश्चिम बंगालचे कामगार राज्यमंत्री झाकीर हुसैन यांच्यावर हल्ला केला.

मुर्शिदाबाद :  बुधवारी रात्री पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील निमिता रेल्वे स्थानकावर काही अज्ञात हल्लेखोरांनी पश्चिम बंगालचे कामगार राज्यमंत्री झाकीर हुसेन यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्यासह सुमारे 7 जण गंभीर जखमी आहेत. झाकीर हुसेन यांना उपचारासाठी कोलकाता येथे हलविण्यात आले आहे. जेथे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. झाकीर हुसेन उभे असलेल्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर क्रूड बॉम्ब फेकल्यामुळे झाकिर हुसेन गंभीर जखमी झाले. स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर हुसेन कोलकाताकडे ट्रेन पकडण्याच्या प्रतिक्षेत असताना रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.

1 एप्रिलपासून फोनवर बोलणं आणि मोबाइल इंटरनेट वापरणं महागणार

त्यांना तातडीनं जंगपीपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं व नंतर कोलकात्याला हलवण्यात आलं.या हल्ल्यात त्यांच्यासमवेत असलेल्या इतर 7 व्यक्तीही जखमी झाल्या आहेत. झाकीर हे मुर्शिदाबादमधील खूप लोकप्रिय नेते आहेत. भाजप बंगालचे प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी हुसेन यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. कोलकाताच्या शेजारील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी थोड्याच एकमेकांपासून थोड्याच अंतरावर आयोजित केलेल्या स्वतंत्र सभांना संबोधित करणार आहेत.

महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी; हवामान खात्याचा वादळासह गारपीटीचा इशारा

पश्चिम बंगालमधील आगामी निवडणुकांसाठी पहिल्यांदाच ममता बॅनर्जी आणि अमित शहा एकाच जिल्ह्यात एकाच वेळी सभा घेतील.गुरुवारी दोन दिवसांच्या दौर्‍यासाठी आमित शहा काल रात्री पश्चिम बंगालला पोहोचले आहेत. ते दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील सागर बेट जवळील काकद्वीप प्रदेशाला भेट देणार आहेत. तेथे ते राज्यातील पाच-टप्प्यांच्या भाजप रथ यात्रेच्या अंतिम टप्प्याला संबोधित करतील.दरम्यान, ममता बॅनर्जी आणि त्यांचा पुतण्या आणि तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे स्थानिक खासदार अभिषेक बॅनर्जी गुरुवारी दक्षिण 24 परगणा येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीला संबोधित करणार आहेत. 

संबंधित बातम्या