पश्चिम बंगालमधील अमित शहांच्या रोड शो नंतर सापडले बॉम्ब

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 3 एप्रिल 2021

विशेष म्हणजे हस्तगत करण्यात आलेले बॉम्ब एका झाडीत आढळून आले होते.

उत्तर चोवीस परगणा : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांच्या आरोप प्रत्यारोपामुळे वातावरण चांगलचं तापलं आहे. दररोज नवनवीन घडामोडी बंगालमध्ये घडत आहेत. आता उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील बरुईपूर भागामध्ये शुक्रवारी छापेमारी करण्यात आली. या छापेमारी दरम्यान 41 क्रूड बॉम्ब हस्तगत करण्यात यश आलं आहे.

विशेष म्हणजे हस्तगत करण्यात आलेले बॉम्ब एका झाडीत आढळून आले होते. याच भागामध्ये गृहमंत्री अमित शहा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांचा रोड शो पार पडला होता. यासंदर्भामध्ये अधिक माहीती देताना निवडणूक अधिकारी म्हणाले, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर या प्रकरणाचा तपास देखील सुरु करण्यात आला आहे. मात्र  अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (The bomb was found after Amit Shahs road show in West Bengal)

बंगाल: निवडणुकीच्या कट्टर वातावरणात 'मोदी' आणि 'ममता'...

अशाप्रकारे स्फोटकं, हत्यारं सापडणं हे पश्चिम बंगालमध्ये नेहमीचंच झालं आहे. यापूर्वी देखील पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आगोदर 26 मार्च रोजी पोलिसांनी 26 क्रूड बॉम्ब हस्तगत करण्यात आले होते. त्यानंतर 28 मार्च रोजी देखील पोलिसांनी नरेंद्रपूर भागामधून 56 बॉम्ब हस्तगत केले होते. बंगालमध्ये मतदान आठ टप्प्यामध्ये होत आहे. दोन टप्प्यातील मतदान आता पार पडलं आहे. तर तिसऱ्या टप्प्याला सुरुवात 6 एप्रिल रोजी होणार तिसऱ्या टप्प्यात 31 जागांसाठी मतदान होणार आहे.

 

संबंधित बातम्या