दोन महिन्यांतच बोम्मईंची अग्निपरीक्षा...

विजयेंद्र हे राज्य भाजपचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. नवीन मंत्रिमंडळात (Cabinet)विजयेंद्र यांना स्थान न दिल्याने गदारोळ उडाला होता.
दोन महिन्यांतच बोम्मईंची अग्निपरीक्षा...
Basavaraj BommaiDainik Gomantak

कर्नाटक: विधानसभेची पोटनिवडणुक नवीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai)यांच्यासाठी एक अग्निपरीक्षाच असणार आहे. बोम्मई यांनी राज्याची सूत्रे हाती घेतली आणि यानंतर दोनच महिन्यांत या निवडणुका (election)होत असल्याचे याकडे पक्ष नेतृत्वाचे बारकाईने लक्ष आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बोम्मई हे पक्षाचे नेतृत्व करणार का? हे सुद्धा यावेळी पहिले जाणार.

आता कर्नाटकात सिंदगी आणि हनगळ या विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुका 30 ऑक्टोबरला पार पडत आहेत. यामध्ये हनगळची जागा भाजपकडे तर सिंदगीची जागा धर्मनिरपेक्ष दलाकडे (JDS) होती. हनगळचे आमदार सी. एम. उदासी यांच्या दुर्दैवी निधनाने ही जागा रिक्त झाली. तसेच JDS चे एम. सी. मानागुळी यांच्या निधनाने सिंदगीचीही जागा रिक्त झाली. आता या जागांसाठी भाजपसह काँग्रेस आणि JDS ने जोर धरला आहे.

Basavaraj Bommai
Goa Vaccination: कर्नाटक राज्याच्या सीमेवरील सुर्ला गाव 100 % लसवंत

निवडणुकीबाबत बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, पोटनिवडणुका मध्ये आम्ही दोन ठिकाणी 100 टक्के जिंकणारच आहे. भाजप (BJP)हा नेहमी शिस्तीचे पालन करणारा पक्ष आहे. बूथ पातळी पासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे व्यवस्थित काम करीत असते. पक्षातील उमेदवाराला बूथ, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरून पाठिंबा मिळणार आहे. पक्ष लवकरच या दोन्ही ठिकाणच्या उमेदवारांची घोषणा करणार आहे. बी. एस. येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्री पदाची शपत घेतली. येडियुरप्पांवर (Yeddyurappa)पक्षाने अद्याप कोणतीही जबाबदारी दिले नाही. त्यांचे पुत्र विजयेंद्र हे राज्य भाजपचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. नवीन मंत्रिमंडळात विजयेंद्र यांना स्थान न दिल्याने गदारोळ उडाला होता.

Related Stories

No stories found.